वातावरणातील बदलामुळे खाजगी दवाखान्यात गर्दी
मानवत : मागील चार दिवसापासून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे नागरिकांमध्ये विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये विशेष करून ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालके यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. हात पाय दुखणे, सर्दी, खांदे दुखणे आदी आजार होत असल्याने नागरिक खाजगी दवाखाने गाठत आहेत. यामुळे शहरातील खाजगी दवाखाण्यात गर्दी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी ओसरली
मानवत: शासनाने बक्षीस पत्र करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी कमी केल्याने ३१ डिसेंबर पर्यंत शहरातील तहसील कार्यालय परिसरात असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात बक्षीस पत्र करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. परंतू, मुदत संपल्याने सद्यस्थितीत गर्दी ओसल्याचे चित्र दिसून येत आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी
मानवत : शहरातील मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी मोकाट जनावर ठाण मांडून बसत असल्यामुळे. वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मोकाट जनावरांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालक, व्यापारी तसेच नागरीकातून होत आहे.
पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट
मानवत :तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीसाठी पंचायत समिती कार्यालयातील सर्व विस्ताराधिकारी, कर्मचारी, शिपाई यांची नियुक्ती करण्यात आल्याने पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागात शुकशुकाट दिसून येत आहे. तसेच गावात निवडणूक असल्याने कार्यालय काम घेऊन येणाऱ्या ग्रामस्थांची ही संख्या रोडावली आहे.