ग्रामपंचायतीचा कारभार कसा करावा, गाव पातळीवर काम करतांना गावाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, सर्व शासकीय योजना गावातील नागरीकांना गावातच कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत आमचा गाव आमचा विकासाच्या माध्यमातून ग्रामविकास आराखड्या संबंधीचे प्रशिक्षण देण्यासाठी तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्या दोन दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २२ व २३ फेब्रुवारी रोजी शहरातील संत जनाबाई महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.२२ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी प्रकाश सोनवणे, सरपंच राजाभाऊ गवळे, प्रशिक्षक अनंता पवार, राजेभाऊ बडवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी चौदाव्या वित्त आयोगात कोण कोणती कामे केली. याचा मागोवा घेत. पंधराव्या वित्त आयोगात झालेले बदल याविषयी उपस्थित ग्रामसेवक व सरपंचाना माहिती देण्यात आली. यावेळी सावित्राबाई फड, विनायक राठोड, संगीता कोरके, वृषाली मुरकुटे, प्रकाश नागरगोजे, कल्पना जाधव, चित्रा कांबळे, संगीता जाधव, वैजनाथ शिंदे, मारोती मुंडे, शिवाजी कातकडे, कुलदीप मादरपल्ले, एम. बी. मुंडे, डी. बी. केंद्रे, बी. वाय. सय्यद, पी. आर. बोरीकर आदींसह ग्रामसेवक व सरपंच उपस्थित होते. सूत्रसंचालन महादेव काडवदे यांनी केले तर संजय परदेशी, अविनाश राठोड, विठ्ठल तुडमे आदींनी परिश्रम घेतले.
दोन दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:26 AM