मजुरांची मजुरी वाढली
पालम: तालुक्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगामातील पिकांची कापणी सुरू झाली आहे. सर्वत्र एकाच वेळी कामे आली आहेत. त्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. पिकाची नासाडी होऊ नये, यासाठी मजुरांची मजुरी वाढ देऊन कामे करून घेतली जात आहेत. त्यामुळे मजुरीचे दर वाढले आहेत.
वीजतारांची अडचण
पालम : शहरात नवा मोंढा व मुख्य रस्त्याने जागोजागी वीजपुरवठा करणाऱ्या तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे उसाची वाहने व माल वाहतूक करणारे ट्रक यांना अडचणी निर्माण होत आहेत. अनेकदा वाहने त्यांना स्पर्श होऊन अपघात होत आहेत. याकडे वीज वितरण कंपनी पाठ फिरवत आहे.
उन्हाचा पारा वाढला
पालम : तालुक्यात मागील दोन दिवसात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उन्हाचा पारा चढत आहेत. ढग येताच सावली व नंतर उन्हाचा चटका सहन करावा लागतो आहे. तसेच अचानक उन्ह लागत असल्याने आजार बळावले आहेत.
हरभरा भाव तेजीत
पालम : तालुक्यात ग्रामीण भागात रब्बी हंगामात हरभरा पीक पेरणी वाढली होती. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी हरभरा आणला जात आहे. हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.