परभणी शहराचा बाह्यवळण रस्ता : भूसंपादन विभाग लागला कामाला;आठवडाभरात जमीन संपादनलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया येत्या आठवडाभरात सुरू होणार असून, सद्यस्थितीला संपादित करावयाच्या जमीन मालकांकडून आलेल्या आक्षेपांचे वर्गीकरण केले जात आहे़कल्याण-निर्मल हा २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून जात आहे़ परभणी शहरातील वाढती वसाहत आणि शहरातून होणारी वाहतूक लक्षात घेऊन या राष्ट्रीय महामार्गाला शहरापासून साधारणत: ८ किमी अंतरावरून वळण रस्ता काढण्यात आला आहे़पाथरी रस्त्यावरील सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाच्या जवळून हा वळण रस्ता निघणार असून, पुढे असोला पाटी येथे वसमत रस्त्याला तो मिळणार आहे़ साधारणत: १४़५ किमी अंतराच्या या वळण रस्त्यासाठी जमिनीचे संपादन करणे ही महत्त्वाची प्रक्रिया आहे़ राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू असून, मानवतपर्यंत हे काम पूर्ण झाले आहे़ परभणी शहराच्या पुढे झिरोफाट्यापासूनही राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे़ शहरालगत असलेल्या वळण रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही़ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वळण रस्त्यासाठी लागणारी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे़ या वळण रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे गटनिहाय आराखडे तसेच शेत सर्वे नंबरनिहाय शेतकºयांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली आहेत़जमिनीची मोजणी आणि इतर बाबी पूर्ण झाल्या असून, उर्वरित काम जिल्हास्तरावरील भूसंपादन विभागाकडे आले आहे़ भूसंपादन विभागाने वळण रस्त्यासाठी ज्या शेतकºयांच्या जमिनी संपादित करावयाच्या आहेत, त्या शेतकºयांच्या नावे नोटीस बजावल्या असून, त्यांच्याकडून आक्षेप मागविले आहेत़ सध्या हे आक्षेप भूसंपादन विभागात दाखल झाले असून, या आक्षेपांवर निर्णय देऊन ते अंतीम करणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कारवाईला सुरुवात होणार आहे़ यासाठी साधारणत: आठ दिवसांचा कालावधी लागणार असून, त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे़ त्यामुळे वळण रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी चिन्हे आहेत़दोनशे : आक्षेप दाखलराष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्यासाठी जमीन संपादनाच्या संदर्भाने भूसंपादन विभागाकडे सुमारे २०० आक्षेप दाखल झाले आहेत़ यात काही जणांनी जमिनीमध्ये असलेल्या झाड, विहिरींची नोंद घ्यावी तसेच काहींनी शेत जमिनीच्या जागे संदर्भातही आक्षेप दाखल केले आहेत़ भूसंपादन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्मापुरी गावातून ७१, असोला येथून ९, पारवा येथून ४, परभणी शिवारातून ६३ आणि वांगी येथून ५१ आक्षेप दाखल झाले आहेत़ या आक्षेपांची सुनावणी घेऊन ते निकाली काढले जातील़ त्यानंतरच प्रत्यक्ष जमीन संपादनाच्या कारवाईला सुरुवात होणार आहे़८४़४५ हेक्टर जमिनीचे होणार संपादन१४़५ किमी अंतराच्या या वळण रस्त्यासाठी असोला, धर्मापुरी, वांगी, परभणी आणि पारवा या गावशिवारातील ८४़४५ हेक्टर जमीन प्रशासनाला संपादित करावयाची आहे़ या संपूर्ण जमिनीची मोजणी झाली असून, तिचा आराखडाही तयार झाला आहे़ शेतकºयांचे आक्षेप निकाली निघाल्यानंतर प्रत्यक्षात संपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे़वळण रस्त्यासाठी जमीन संपादित करण्यापूर्वी शेतकºयांकडून आक्षेप दाखल झाले आहेत़ धर्मापुरी येथील ७१ आक्षेपांवर जवळपास निर्णय झाला आहे़ गुरुवारी परभणी शिवारातील ६३ आक्षेपावर सुनावणी घेऊन ते निकाली काढले जातील़ ज्या शेतकºयांचे आक्षेप आहेत़ त्या त्या आक्षेपानुसार जमिनीची पुनर्माेजणी करणे, प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणे आदी कामे येत्या दोन-चार दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत़ भूमिअभिलेख विभागातील अधिकारी, भूसंपादन विभागातील अधिकारी आणि संबंधित एजन्सीच्या माध्यमातून स्थळ पाहणी केली जाणार आहे. त्यानंतरच या बाह्यवळण रस्त्यासाठी जमीन संपादनाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार आहे.-डॉ़ संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन
परभणी शहराचा बाह्यवळण रस्ता : भूसंपादन विभाग लागला कामाला;आठवडाभरात जमीन संपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:58 PM