शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

मोठी बातमी! सिग्लन बिघडवून अजिंठा रेल्वेत लुटीचा प्रयत्न, पोलीस आले अन चोरटे पळाले

By राजन मगरुळकर | Published: May 31, 2023 7:22 PM

पेडगाव स्थानकाच्या जवळील होम सिग्नलचे टूल बॉक्स तोडल्याचे यावेळी पोलिसांना आढळून आले.

परभणी : मनमाड येथून सिकंदराबादला जाणारी अजिंठा एक्सप्रेस रेल्वे देवलगाव अवचार ते पेडगाव स्थानकाच्या दरम्यान येताना पेडगाव स्थानकाच्या नजीक चोरट्यांनी सिग्नलचे टूल बॉक्स तोडून रेल्वेमध्ये लुटीचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास घडली आहे. यामुळे सिग्नलमध्ये बिघाड झाला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबतची रेल्वे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, रेल्वे क्रं (१७०६३) मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेस ही रेल्वे नेहमीप्रमाणे दररोज रात्री दीडच्या सुमारास मानवत रोड स्थानकावरून परभणीकडे येण्यासाठी निघाली होती. मानवत रोड नंतर देवलगाव अवचार स्थानक सोडल्यावर पेडगावच्या दिशेने रेल्वे जात असताना पेडगाव स्थानकाजवळील कॉलिंग सिग्नलमध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले. त्यावेळी रेल्वे स्टेशन मास्तर आयुब पठाण यांनी सिग्नलमध्ये बिघाड झाल्याची सदरील माहिती गस्तीवरील जीआरपी पोलीस, आरपीएफ तसेच होमगार्ड यांना दिली. 

पेडगाव स्थानकाच्या जवळील होम सिग्नलचे टूल बॉक्स तोडल्याचे यावेळी पोलिसांना आढळून आले. घटनास्थळी पोलीस कर्मचारी अविनाश डावरे, आरपीएफचे विष्णू पंडाळे, जाधव हे त्या ठिकाणी पोहोचले. अज्ञात चोरट्यांनी होम सिग्नलचे टूल बॉक्स तोडून सिग्नलमध्ये बिघाड केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे रेल्वे अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी थांबली होती. आरपीएफ तसेच जीआरपी पोलीस हे बिघाडाच्या ठिकाणी जात असताना चोरट्यांनी तेथून पोलीस पाहून पळ काढला. या घटनेमुळे मध्यरात्री परभणी-मानवत रोड दरम्यान धावणाऱ्या तीन ते चार रेल्वे उशिराने धावल्या. या घटनेत चोरट्यांनी कोणताही ऐवज किंवा चोरी केल्याचे आढळून आले नाही.

एस-६ डब्यावर दगडफेकमनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेसच्या सिग्नलमध्ये टूलबॉक्स सोडून बिघाड करून चोरीचा प्रयत्न करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस चोरट्यांच्या दिशेने जात असताना चोरट्यांनी एस -६ क्रमांकाच्या डब्यावर दगडफेक केली. मात्र, यात कोणालाही दुखापत किंवा इजा झाली नाही तसेच कोणताही मुद्देमाल चोरीला गेला नाही.

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदसदरील प्रकरणामध्ये चोरीचा प्रयत्न करणे तसेच सिग्नलचे नुकसान करणे अशा विविध प्रकारामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३४१, कलम ३४६ अंतर्गत जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास नांदेड जीआरपीचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे करीत आहेत.

घटनास्थळी अभियंते, टेलिकॉम यंत्रणेचे अधिकारीहोम सिग्नलचे टूलबॉक्स सोडल्यामुळे झालेल्या प्रकारामुळे रेल्वे काही वेळ एकाच ठिकाणी थांबून होती. या ठिकाणी आरपीएफचे पोलीस अधिकारी वाघ यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारानंतर काही रेल्वे उशिराने धावल्या. यामध्ये नंदिग्राम, साप्ताहिक तिरुपती रेल्वे, नरसापुर रेल्वे या विलंबाने धावल्या. घटनास्थळी दुरुस्तीसाठी टेलिकॉम तसेच विभागातील अभियंते यांनी भेट देऊन त्वरित दुरुस्ती काम केले.

टॅग्स :Robberyचोरीrailwayरेल्वेparabhaniपरभणी