शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

मानोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडून २ लाखाचा मुद्देमाल लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 5:23 PM

गुंगीच्या औषधाचा वापर केल्याचा संशय

मानोली (परभणी ) : मानवत तालुक्यातील मानोली येथे सोमवारी मध्यरात्री दोन घरे फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिण्यांसह २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानोली येथील काकडे गल्लीत राहणाऱ्या दत्तराव रामभाऊ मांडे यांच्या घरात सोमवारी (दि.८ ) मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील ७० हजार रुपये व ३ तोळे सोने लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा विठ्ठल ज्ञानेदव मांडे यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या घरात प्रवेश करून संसारोपयोगी सामानाची नासधूस केली. त्यानंतर पत्र्याच्या पेटीत ठेवलेले ५० हजार रुपये लांबविले. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सेलू येथील पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधिकारी सुदाम शेलार, गजानन गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील बबनराव तळेकर, सरपंच ज्ञानोबा शिंदे, उपसरपंच भगवान भांड, नरेश मांडे, सुदाम शिंदे, सुरेश काकडे, वसंत मांडे आदींची उपस्थिती होती. 

गुंगीच्या औषधाचा वापरही घटना घडत असताना घरातील एकाही सदस्याला या घटनेची कुणकुण लागली नाही. त्यामुळे चोरट्यांनी चोरी करताना गुंगीच्या औषधाचा वापर केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने तत्काळ या घटनेतील चोरट्यांना पकडून कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीRobberyदरोडा