शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

रोबोट करणार शेती; ड्रोन करणार फवारणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:57 AM

कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी यंत्र मानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे होणार डिजिटल शेती

ठळक मुद्देपरभणी कृषी विद्यापीठात प्रशिक्षण प्रकल्प १८ कोटींचा निधी मंजूर वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी,स्पेन, युक्रेन व बेल्लारूस येथील विद्यापीठांशी करार

- प्रसाद आर्वीकर 

परभणी : हवामानातील बदल, वारंवार येणारा दुष्काळ, मजुरांचा प्रश्न या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता आपली शेती रोबोटच्याच हवाली केली जाणार आहे. या डिजिटल शेतीच्या प्रकल्पासाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भारतीय कृषी संशोधन परिषदेने हिरवी झेंडी देतानाच १८ कोटींचा निधीही मंजूर केला आहे़ 

‘कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी यंत्र मानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती’ या विषयावरील सेंटर आॅफ एक्सलन्स हा प्रशिक्षण प्रकल्प परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून नवी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेला सादर केला होता़ त्यास या परिषदेचे राष्ट्रीय संचालक डॉ़ राकेशचंद्र अग्रवाल यांनी मंजुरी दिली आहे़ आंतरराष्ट्रीय दर्जाचा देशातील हा एकमेव प्रशिक्षण प्रकल्प असेल. २०१९ ते २०२२ या तीन वर्षांचा हा प्रकल्प असून, या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या १८ कोटी रुपयांपैकी ५० टक्के वाटा जागतिक बँकेचा आणि ५० टक्के वाटा केंद्र शासनाकडून दिला जाईल. या प्रकल्पाची प्राथमिक संकल्पना प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ गोपाळ शिंदे यांची असून समन्वयक डॉ़ राजेश कदम आहेत. 

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणारयंत्र मानव (रोबोट), ड्रोन, स्वयंचलित डिजीटल साधनांचा समावेश असणाऱ्या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण केल्या जातील. विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांना या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण दिले जाईल. हेच कौशल्यप्राप्त प्रशिक्षणार्थी डिजीटल शेतीचे तंत्र पुढे शेतकऱ्यांपर्यंत नेतील. मजुरांचा प्रश्न, निविष्टांचा खर्च, बदलते हवामान, कमी होणारे पाणी या समस्यांवर डिजीटल तंत्रज्ञानाच्या आधारे मात करणे शक्य आहे़  स्वयंचलित वाहनाद्वारे पीक हताळणी, रोगनिदान व उपाय, काढणी व वाहतूक करणे शक्य होईल़ ड्रोनद्वारे कार्यक्षमरित्या पीक पाहणी व निरीक्षण, जमिनीतील शुष्कता, पिकांवरील रोग व निदान, किटकनाशकांची फवारणी हे कॅमेरा व सेंसर तंत्रज्ञानाद्वारे शक्य होईल़ या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आवश्यक ती मनुष्यबळ निर्मिती करून रोजगार व स्वयंरोजगार संधी निर्माण केल्या जातील, अशी माहिती कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी दिली. 

३०० कौशल्यप्राप्त कृषी उद्योजक निर्माण करणारचार मुख्य भागांत या केंद्राचे काम चालेल़ त्यात हवामान आधारित डिजीटल ज्ञानात्मक पाठबळ केंद्र, बी-बियाणे प्रक्रिया व रोपवाटिका, स्वयंचलित केंद्र, स्मार्ट पोर्टेबल मशिनरी केंद्र व अन्न प्रक्रिया स्वयंचलित केंद्राचा समावेश आहे़ एक वर्षाच्या या अभ्यासक्रमात यंत्र मानव विभाग, ड्रोन विभाग व स्वयंचलित यंत्रविभाग या तीन विभागांत प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल़ विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर आणि आचार्य पदवीधारक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र राहतील. यातून किमान ३०० कौशल्यप्राप्त कृषी उद्योजक निर्माण करण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे़ 

विदेशी विद्यापीठांशी करारकृषी विद्यापीठाने अ‍ॅग्री रोबोट, अ‍ॅग्री ड्रोन्स व अ‍ॅग्री स्वयंचलित यंत्राच्या देवाण-घेवाणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी तसेच स्पेन, युक्रेन व बेल्लारूस येथील विद्यापीठांशी करार केला आहे़ पवई व खरगपूर येथील आयआयटीचे नॉलेज सेंटर म्हणूनही सहकार्य लाभणार आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठparabhaniपरभणी