शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

साहेब, आता तरी रस्ता द्या! आश्वासनांना कंटाळलेले कोल्हेवाडी ग्रामस्थ चिखलात लोळले

By मारोती जुंबडे | Published: September 10, 2024 6:59 PM

 कोल्हेवाडी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन, तरीही प्रशासन दखल घेईना 

- विनायक देसाईपूर्णा: गावाला जायला 75 वर्षापासून रस्ता नाही. दीड किलोमीटर रस्ता मिळावा यासाठी वारंवार प्रशासनाला साकडे घालण्यात आले मात्र प्रशासकीय काम आणि सहा महिने थांब या म्हणीचा अनुभव कोल्हेवाडी ग्रामस्थांना आला अखेर प्रशासनाच्या आश्वासनाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता रस्त्यावरील चिखलात लोळत अनोखे आंदोलन केले. आता तरी प्रशासन या रस्ता दुरुस्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करेल का? असा सवाल चिखलात लोळल्यानंतर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

परभणी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्गांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा या रस्त्यांवरील खड्डा चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला. तर ग्रामीण भागात रस्ते चक पांदण रस्ते बनले आहेत, अशातच पूर्णा तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामस्थांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षापासून गावाला जायला रस्ता नाही. कानड खेड ते कोल्हेवाडी हा दीड किलोमीटर चा रस्ता किमान मुरूम टाकून तरी पक्का करून द्यावा असे साखरे शासन आणि प्रशासनाला ग्रामस्थांनी वारंवार घातले त्यात लोकप्रतिनिधींना तर अनेकदा विनवण्या केल्या मात्र प्रशासकीय काम पण शासनाचे दुर्लक्ष याचा मोठा फटका कोल्हेवाडी ग्रामस्थांना बसला. त्यामुळे आजही गुडघ्या इतका चिखल तुडवत ग्रामस्थांना कोल्हेवाडी गाव गाठावे लागते. 

रस्त्याला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी अखेर 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत रस्त्यावरील चिखलात लोळून घेतले दुपारपर्यंत चाललेल्या या आंदोलनाकडे प्रशासकीय अधिकारी फिरकलेच नाहीत अखेर चिखलाने भरलेले अंग घेऊन ग्रामस्थ तहसीलदारांच्या कक्षात गेले त्यानंतर साहेब आम्ही रस्ता मिळावा म्हणून चिखलात लोळलो किमान आता तरी आम्हाला पक्का रस्ता द्यावा असे साकडे घातले या आंदोलनात सचिन नशीर अजय खंदारे सुबोध खंदारे प्रदुध काळे वैभव जाधव सुरेश कदम माणिक बार्शी नवनाथ भालेराव सतीश पवार नरारी पवार ज्ञानेश्वर पवार शिवाजी पवार चंद्रकांत पवार माधव खरबे दतराव पारटकर खंडू पाटील हरिभाऊ डहाळे गजानन पवार संतोष वैद्य गणेश भालेराव पवन खरबे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षा