परभणी- गंगाखेड रस्त्यावरील ताडपांगरी फाटा परिसरात किसान बायो डिझेल पंप सुरू असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली. त्यावरुन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी या डिझेल पंपाची तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार संजय बिराजदार यांना दिले होते. २० ऑगस्ट रोजी तहसीलदार संजय बिरादार, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, अव्वल कारकून एन. पी. वडजे, सहायक फौजदार एल. पी. मुंडे आदींचे पथक स्थापन करून किसान बायो डीझेल पंपाची तपासणी करण्यात आली. यावेळी कागदपत्रांची मागणी केली असता बायोडिझेल विक्री संदर्भात परवाना आढळला नाही. त्यामुळे हा पंप सील करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी ४ सप्टेंबर रोजी तहसीलदार संजय बिरादार यांनी दैठणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पंपचालक ज्ञानेश्वर वैरागर याच्याविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विनापरवाना बायोडिझेलची विक्री; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:22 AM