शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

परभणी मनपाच्या दुर्लक्षामुळे वाढली पाण्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:33 PM

शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना महापालिकेने अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरामध्ये पियाजो आॅटोरिक्षातून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरु झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना महापालिकेने अद्यापही पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरामध्ये पियाजो आॅटोरिक्षातून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची विक्री सुरु झाली आहे.उन्हाळ्यामध्ये दरवर्षी परभणी शहरातील ठराविक भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. राहटी येथील बंधाऱ्यातून शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र अनेक भागामध्ये या योजनेची जलवाहिनी पोहचलेली नाही. सहा महिन्यांपूर्वी काही भागात नव्याने जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र या जलवाहिनीला मुख्य वाहिनीशी जोडले नसल्याने नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. सद्यस्थितीला अनेक प्रभागांमध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत असली तरी महापालिकेकडून अद्यापही टँकर सुरु करण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.नळ योजना उपलब्ध नसल्याने हातपंपावर भिस्त असलेल्या अनेक वसाहतींमधील नागरिक खाजगी व्यावसायिकांकडून पाणी विकत घेऊन दररोजची गुजराण करीत आहेत. पाण्याची मागणी वाढत चालल्याने खाजगी व्यावसायिकांचा व्यवसायही आता तेजीत आला आहे. शहरामध्ये ४० ते ५० खाजगी पियाजो आॅटोरिक्षांमधून शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. या पियाजो आॅटोला मोटारपंप लावलेला असून १ हजार लिटरची टाकी दीडशे रुपयांना तर २ हजार लिटरची टाकी ३०० रुपयांना विक्री केली जात आहे.परभणी शहरात खाजगी विक्रेत्यांकडून पाण्याची विक्री सुरु झाली असून आगामी काळात ही परिस्थिती आणि गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाजगी विक्रेत्यांचीही संख्याही वाढण्याची चिन्हे आहेत. दोन वर्षांपासून या खाजगी विक्रेत्यांना जलकुंभावरुन पाणी दिले जात नसल्याने शहर परिसरातील शेतांमधून पाणी आणून हे पाणी विक्री केले जात आहे. महापालिकेने वेळेत टँकर सुरु केले तर पाणीटंचाई शिथील होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाई बरोबच आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे.टंचाई निवारण्याची कामे ठप्प४शहरातील टंचाई दूर करण्यासाठी मनपाने जिल्हा प्रशासनाला कृती आराखडा सादर केला आहे. या आराखड्यास अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने ही कामे ठप्प आहेत. शहरवासियांना टँकरने पाणीपुरवठा करणे, तात्पुरत्या स्वरुपात जलवाहिनी टाकून टंचाईग्रस्त भागात पाणी उपलब्ध करुन देणे, हातपंपाची दुरुस्ती, नवीन विंधन विहीर घेणे ही कामे अजूनही सुरु नाहीत. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये भर पडली आहे. महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करुन टंचाई निवारण्याच्या कामाला सुरुवात करण्याची गरज निर्माण झाली आहे.४टंचाई निवारणाचा निधी उपलब्ध नसल्याने कामे ठप्प असली तरी जलवाहिनीची गळती रोखण्याचे काम महापालिका हाती घेऊ शकते; परंतु, प्रत्येक आवर्तनाच्या वेळी हजारो लिटर पाणी वाया जात असताना मनपाकडून जलवाहिनीच्या गळती, दुरुस्तीची कामे केली जात नसल्याने टंचाईत भर पडत आहे.नळयोजना पडली अपुरी४शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. ही योजना ३० वर्षापूर्वीची जुनी आहे. सध्या शहराची लोकसंख्या दुप्पटीने वाढली आहे. तरीही याच योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचते करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय वाढत आहे. तसेच सद्यस्थितीला १२ ते १३ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरामध्ये पाणीटंचाई वाढली आहे.मनपाच्या टँकरने पाणी पुरवठा४शहरामध्ये महापालिकेने मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला नसला तरी मनपाच्या टँकरने पाणी विकत दिले जात आहे. शहरातील प्रभावती नगर येथील जलकुंभावरुन खाजगी विक्रेत्यांना पाणी दिले जात नाही, अशी माहिती देण्यात आली. मात्र दररोज चार ते पाच टँकर महापालिकेची नियमानुसार असलेली रक्कम भरुन टँकरने पाणी नेत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मनपाने मोफत पाणीपुरवठा सुरु केला नसला तरी टँकरच्या सहाय्याने पैसे भरुन पाणी दिले जात असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका