ब्रेक द चेन अभियानात सलून व्यावसायिकांची दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. घरातील दागिने विकून दुकान भाडे, घर भाडे व वीज बिलाचा भरणा करावा लागत आहे. कर्जांच्या हप्त्यांमुळे अनेक व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत व्यवसाय बंद ठेवला जात असल्याने आर्थिक उत्पन्नाची साधनेच बंद करण्यात आली असून, हा नाभिक समाजावर अन्याय आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे जगावे कसे, असा प्रश्न समाज बांधवांसमोर पडला आहे. तेव्हा सलून दुकाने पूर्ववत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, सर्व वयोगटातील सलून कारागीर व व्यावसायिकांचे तत्काळ कोरोना लसीकरण करावे, कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा उपमहापौर भगवान वाघमारे, जिल्हाध्यक्ष संपत सवने, पांडुरंग भवर, श्याम साखरे, आत्माराम प्रधान, आत्माराम राऊत, दगडू राऊत, गोविंद भालेराव, वसंत पारवे, प्रकाश कंठाळे, गोविंद शिंदे, बालाजी कंठाळे, संतोष वाघमारे, गणेश भुसारे आदींनी दिला आहे.
सलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:17 AM