अवैध धंदे तेजीत
परभणी : जिल्ह्यात मटका, जुगार यासह प्रतिबंधित गुटखा विक्री वाढली आहे. पोलीस प्रशासन या अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करीत असले, तरी ग्रामीण भागातून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन झाले नाही. मोठ्या कारवाईची गरज आहे.
दहा दिवसांआड पाणी
परभणी : शहरातील अनेक भागांमध्ये दहा दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. भूजल पातळी खालावल्याने आता नागरिकांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तेव्हा पाण्याचे आवर्तन कमी करावे, अशी मागणी आहे.
बाजारपेठेत गर्दी
परभणी : शहरात बाजारपेठ भागामध्ये सायंकाळच्या सुमारास मोठी गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
वाहनधारकांची गैरसोय
परभणी : रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम सुरू असून, त्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठात जाणाऱ्या वाहनधारकांची मागील तीन महिन्यांपासून गैरसोय होत आहे.