शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

ेपरभणी : बारा लाखांचे दागिने लुटणारे चौघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:02 AM

सोन्या-चांदीचे दागिने घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून दागिन्यांची लूट करणाºया चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ मार्च रोजी रात्री गजाआड केले असून आरोपींकडून १२ लाख २०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोन्या-चांदीचे दागिने घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून दागिन्यांची लूट करणाºया चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ मार्च रोजी रात्री गजाआड केले असून आरोपींकडून १२ लाख २०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.१३ फेब्रुवारी रोजी पाथरी येथील व्यापारी शेख सौरभ अली शेख अमजद अली हे त्यांचे दुकान बंद करुन मोटारसायकलवरुन घरी जात असताना चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करीत दागिन्यांची बॅग हिसकावून नेली होती. सुमारे १२ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे कारने पळून गेले होते. या घटनेनंतर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.परभणी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला असता प्रकरणातील आरोपींचा सुगावा लागला. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन सापळा रचला. परभणी शहरात मोटारसायकलवरुन जाणाºया कृपानसिंग हत्यारसिंग टाक (२३, रा.कळमनुरी ह.मु.अहमदपूर) आणि रुपसिंग चतुरसिंग टाक (२३, रा.सरगमनगर, सोलापूर) या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा करताना गौतम भगवानदास आदमाने (२५, रा.सारोळा) आणि प्रताप मधुकर मस्के (३२, रा.आर्वी ता. परभणी) हे दोघेही सोबत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्हा करण्यासाठी एक कार आणि एक दुचाकी वापरल्याचे आरोपींनी सांगितले. पोलीस पथकाने उर्वरित दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेतले आहे. सोने लुटीच्या प्रकरणात अटक झालेल्या चारही आरोपींकडून २० तोळे सोने, २ किलो चांदी, एक इंडिका कार, एक मोटारसायकल तीन मोबाईल, एक खंजिर असा १२ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ४५ दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सुनील गोपीनवार, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, जमिरोद्दीन फारोखी, अरुण कांबळे, गौस पठाण, दिलावर पठाण, शंकर गायकवाड, विशाल वाघमारे यांनी केली.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसtheftचोरीjewelleryदागिने