परभणी: तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ११७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २० नोव्हेंबर रोजी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले असून, त्यातील ५८ ग्रामपंचायतींचे सरपंचपद विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर महिला राज येणार आहे.
तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी येथील बी.रघुनाथ सभागृहात आरक्षण सोडतीचे आयोजन केले होते. सकाळपासूनच सोडतीसाठी ग्रामीण भागातून ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तहसीलदार डॉ.संजय बिरादार, नायब तहसीलदार श्रीरंग कदम, मंदार इंदूरकर, वसीम पठाण यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी ८ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राखीव झाले आहे.
अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ८, अनुसूचित जमाती महिलांसाठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १६ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राखीव झाले आहे. त्याचप्रमाणे खुल्या प्रवगार्साठी ३४ ग्रामपंचायतींचे तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ३३ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राखीव झाले आहेत. सरपंच पदाच्या आरक्षणाविषयी ग्रामीण भागात मोठी उत्सूकता लागली होती. आरक्षण जाहीर होताच गाव पुढाऱ्यांनी निवडणुकीची समिकरणे जुळविण्यास प्रारंभ केला आहे.
असे आहे सरपंच पदाचे आरक्षण- सर्वसाधारण : आंगलगाव, जांब, झरी, ब्राह्मणगाव, दामपुरी, एकुरखा तर्फे पेडगाव, इंदेवाडी, कैलासवाडी, किन्होळा, मांडाखळी, पेगरगव्हाण, पिंगळी कोथाळा, सिंगणापूर, शिर्शी खु., सूरपिंपरी, उखळद, शहापूर, हसनापूर, आसोला, पिंगळी, सायाळा खटींग, कौडगाव, कारेगाव, तट्टूजवळा, रायपूर, संबर, ब्रह्मपुरी तर्फे पाथरी, धार, मांगणगाव, पाथरा, शर्शी बु., इस्माईलपूर, पान्हेरा (गव्हा), नरसापूर.
- सर्वसाधारण महिला : करडगाव, वरपूड, धारणगाव, सोन्ना, वडगाव सुक्रे, शेंद्रा, बोरवंड खु., परळगव्हाण, पिंपळा, ठोळा, पिंपळगाव सय्यदमियाँ, साटला, साडेगाव, आनंदवाडी, कोटंबवाडी, पिंपळगाव टोंग, टाकळी बोबडे, साळापुरी, बाभुळगाव, मटकऱ्हाळा, इठलापूर देशमुख, कुंभारी (कारला), हिंगला, दैठणा, उजळंबा, आंबेटाकळी, नांदगाव बु., नांदगाव खु., जलालपूर (खानापूर तर्फे झरी), सावंगी खु., नागापूर, नांदापूर, मांडवा.
- नागरिकांचा मागास प्रवर्ग : भोगाव, उमरी, वांगी, झाडगाव, नांदखेडा, पोरवड, डिग्रस, गोविंदपूर (सारंगपूर), सनपुरी (सुलतानपूर), धसाडी, डफवाडी, तरोडा (ब्रह्मपुरी तर्फे लोहगाव), पांढरी, वाडी दमई, बलसा खु,, मिर्झापूर.
- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : साबा, पोखर्णी नृ., पेडगाव, जोडपरळी, टाकळगव्हाण, ताडपांगरी, राहाटी, आळंद (मोहपुरी), आलापूर पांढरी, आमडापूर, ब्रह्मपुरी तर्फे पेडगाव, दुर्डी, समसापूर, बाभळी, मिरखेल, काष्टगाव.
- अनुसूचित जमाती महिला : भारस्वाडा- अनुसूचित जमाती : लोहगाव- अनुसूचित जाती : देवठाणा, पोरजवळा, ताडलिमला, टाकळी कुंभकर्ण, सहजपूर (जवळा), माळसोन्ना, पारवा, धोंडी.- अनुसूचित जाती महिला : मुरुंबा, आर्वी, पिंपळगाव ठोंबरे, पिंपरी देशमुख, वडगाव तर्फे टाकळी, तामसवाडी, धर्मापुरी, बोरवंड बु.