शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी व पीक विमा मंजूर करण्यात यावा अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली आहे. याची प्रशासनाने दखल घेऊन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञांना पालम तालुक्यातील वाळलेल्या तुरीची पाहणी करून अभ्यास करण्याकरिता पाठवण्यात आले होते. यात परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यु .एन. आळसे ,आपेट ,संदीप जगताप त्यांच्यासोबत पालम तालुका कृषी अधिकारी देशमुख ,मंडळ कृषी अधिकारी वनवे मॅडम ,कृषी सहाय्यक हनवते, दत्ता दुधाटे, आनंदराव ,खरटमल यांच्यासह शेतकरी बंटी लांडगे, ओमकार लांडगे, शिवलिंग खेडकर यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते .पथकाने तालुक्यातील बनवस रावराजुर व शेखराजुर येथे तुरीच्या शेतात भेटी दिल्या. फुलोरा असलेल्या अवस्थेतच तुरीचे पीक वाळलेले त्यांना दिसून आले. त्यानंतर कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या पाहणीनंतर निष्कर्ष काढला. या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन तुरीच्या झाडावर फायटोपेरा नावाचा रोग येऊन तुरीचे हिरवेगार असलेले झाड वाळून गेले आहे असे शास्त्रज्ञांनी उपस्थित तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांना सांगितले.
पालम तालुक्यात तुरीची शास्त्रज्ञांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:43 AM