- विठ्ठल भिसेपाथरी (परभणी): मराठा आरक्षण मुद्दा दिवसेंदिवस कळीचा बनत चालला आहे.आरक्षणासाठी आता गाव पातळीवर एकत्र बसून निर्णय घेतले जात आहेत. मराठा आरक्षण समर्थनासाठी चाटे पिंपळगाव गावाने अनोखा निर्णय घेत ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी अख्खे गाव मैदानात उतरविण्याचे ठरवले आहे.शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. गावातील जवळपास 300 महिलांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रे जुळविण्यात येत आहे. येथील ग्रामपंचायतच्या एका जागेच्या पोट निवडणुकीसाठी (सर्वसाधारण महिला)अख्खे गाव उमेदवारी अर्ज भरत गांधीगिरी करत असल्याने हा मुद्दा चांगलाच चर्चेचा ठरत आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथील मराठा आरक्षण संदर्भात झालेल्या सभेनंतर आता आरक्षण मुद्दा गाव पातळीवर चांगलाच चर्चेला जाऊ लागला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय ही घेण्यात आला तसे बोर्ड अनेक गावात झळकू लागले आहेत. आता मराठा आरक्षण संदर्भात पाथरी तालुक्यातील चाटे पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी ही वेगळा निर्णय घेतला आहे. चाटे पिंपळगाव येथील ग्रामपंचायतची एका जागेची पोट निवडणूक आहे. प्रभाग क्रमांक दोन मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ही निवडणूक होत आहे. उद्या शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. एक जागा आणि अख्खा गाव मैदानात. या निवडणुकीत चित्र दिसत आहे गावात याबाबत बैठक घेण्यात येऊन गावातील महिलांनी एकत्र येत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्णय झाले.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सोळा उमेदवारी अर्ज दाखल झाले. शुक्रवारी शेवटच्या दिवशी किती अर्ज येतात याकडे लक्ष लागले आहे. जर गावातील सर्व महिलांनी उमेदवारी अर्ज भरले तर निवडणूक घेण्यासाठी पेच निर्णम झाला आहे.चाटे पिंपळगाव मध्ये 998 मतदार आहेत प्रभाग 2 मध्ये 270 मतदार आहेत. प्रभाग 2 मधील रिक्त झालेल्या सर्वसाधारण महिला जागेवर आता ही निवडणूक होत आहे ,