मानवत येथे महेश सेवाभावी संस्थेच्या वतीने ६ जुलै रोजी श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टच्या माहिती तंत्रज्ञान समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर येथील राजगोपाल मिनियार यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मिनीयार म्हणाले की, आयोध्येतील मंदिराचे काम अत्यंत भव्यदिव्य होत असून ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या आशीर्वादामुळे आपणास तेथे काम करण्याची संधी मिळाली. मंदिर निर्माण झाल्यानंतर भाविकांना दर्शन, देणगी व अन्य सुविधा ऑनलाइन पध्दतीने उपलब्ध करण्याचे काम माहिती तंत्रज्ञान समिती करणार आहे. तसेच हे संपूर्ण काम पारदर्शक पध्दतीने केले जात असून नुकत्याच उद्भवलेल्या जमिनीबद्दलच्या चर्चा निरर्थक आहेत. यावेळी बोलताना डॉ. राजकुमार लड्डा यांनी राजगोपाल मिनीयार यांच्या कार्याचा गौरव केला. कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष संजयकुमार लड्डा, सुरेश काबरा, गोविंद राठी, नवलकिशोर मंत्री, पंकज लाहोटी, ॲड. गजानन शिंदे, सत्यनारायण चांडक, रूपेशजी काबरा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जोशी यांनी केले.
आयोध्येतील कर्मयोग्यांचे काम बघून अहंकार गळुन पडतो : मिनीयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:13 AM