सेलू (परभणी ) : निम्म दूधना प्रकल्पाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या सेलू येथिल दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, येथे बुडून मृत्यू होण्याची मागील चार महिन्यातील ही चौथी घटना आहे.
सेलू येथिल डाॅ.झाकिर हूसेन नगरातील सहा मिञ व त्यांच्या कुटूंबातील काहीासदस्य निम्म दूधना प्रकल्पाचा परिसर पाहण्यासाठी आज दूपारी दोनच्या सुमारास गेले होते.डब्बा पार्टी केल्यानंतर सय्यद अमन सय्यद उस्मान ( वय १८) व शेख जुनेद शेख सलिम ( वय १७) हे दोघे फेर फटका मारून येतो असे सांगुन वाकडी शिवारातील जलाशयात पोहण्यासाठी उतरले.
यात सय्यद अमन सय्यद उस्मान याला पाण्याचा अंदाज न अाल्याने तो बुडू लागला. हे लक्षात येताच शेख जुनेदने त्यास वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यात दोघांचाही पाण्यात बूडून मृत्यु झाला. सोबतच्या मित्रांना हे लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून तेथील मच्छीमार मदतीसाठी धावली. त्यांनी मृतदेह बाहेर काढली.