शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ३० जून रोजी गस्त घालत होते. यावेळी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत विकास नगर येथे एका घरामध्ये अवैध शस्त्रसाठा ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने येथे दुपारी छापा टाकला. संगतसिंग निहालसिंग टाक या आरोपीच्या घरात सात तलवारी, एक खंजीर व एक गावठी भरमार बंदूक आढळून आली. या प्रकरणी आरोपी संगतसिंग निहालसिंग टाक याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, हनुमंत जक्केवाड, हरिशचंद्र खूपसे, बाळासाहेब तुपसुंदर, आशा सावंत, दिलावर खान, किशोर चव्हाण, सय्यद मोबीन, शेख अजहर, पिराजी निळे, संतोष सानप यांनी केली.
घरामध्ये आढळल्या सात तलवारी, एक खंजीर, गावठी बंदूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:14 AM