राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
मानवत : येथील केकेएम महाविद्यालयात जागितक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता ‘कोविड-१९: महिलांची स्थिती’ या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात मुंबई येथील मानोपसार तज्ज्ञ डॉ.प्रियंका जोग, ॲड.माधुरी क्षीरसागर या मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी माजी जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांची उपस्थिती राहणार आहे. या चर्चासत्रात जास्तीतजास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे, डॉ.तुकाराम मुंडे, समन्वयक डॉ.शारदा राऊत यांनी केले आहे.
इंधन दरवाढीमुळे वाहनचालक हैराण
खंडाळी : इंधनाचे दर गगनाला भिडल्याने गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथील वाहनधारक हैराण झाले आहेत. एकीकडे इंधन शंभरीच्या पार गेले आहे, तर दुसरीकडे प्रवासी मात्र जुन्याच दराने भाडे अदा करीत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. परिणामी, वाहनधारकांचे बजेट कोलमडले असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन इंधनाचे दर कमी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आहे.