येथील अक्षदा मंगल कार्यालयात २४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन खा. बंडू जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ.डॉ. राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, प्रभाकर वाघीकर, सहसंपर्कप्रमुख सुधाकर खराटे, संजय गाडगे, माणिक पोंढे, माणिकराव आव्हाड, रवींद्र धर्मे, सदाशिव देशमुख, दशरथ भोसले, अनिल कदम, रणजित गजमल, काशिनाथ काळबांडे, नंदू आवचार, पंढरीनाथ घुले, हनुमंतराव पौळ, मुंजाभाऊ कोल्हे, अनिल सातपुते, अतुल सरोदे, अर्जुन सामाले, दीपक बारहाते, महिला आघाडीच्या सखूबाई लटपटे, संजय सारणीकर, संतोष गायकवाड, सुनील काकडे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.डॉ. राहुल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण असून निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी या धोरणानुसार काम करावे. प्रा.डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यास नवविर्वाचित ग्रा.पं. सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिकांनी गाव विकासासाठी प्रयत्न करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:18 AM