शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

परभणीत महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:29 IST

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. तसेच जैन मंदिरामध्ये अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. तसेच जैन मंदिरामध्ये अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम पार पडले.बुधवारी परभणी शहरात भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आनंदनगर येथील नेमीनाथ दिगंबर जैन मंदिरात सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण झाले. त्यानंतर आनंदनगर ते भजनगल्लीपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भजनगल्ली येथून सकाळी सव्वा आठ वाजता भगवान महावीर यांच्या प्रतिमेच्या शोभायात्रेला प्रारंभ झाला. नानलपेठ, शिवाजी चौक, गांधी पार्क, माळी गल्ली आणि परत गांधी पार्क येथील जैन स्तंभाजवळ या शोभायात्रेचा समरोप झाला. यावेळी नवनिर्माणाधिन स्तंभाची पूजा करण्यात आली. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील, महापौर मीनाताई वरपूडकर, क्रांतीताई जाधव, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, राजेश विटेकर, मनपातील सभागृहनेते भगवान वाघमारे, नगरसेवक सचिन अंबिलवादे, अमोल जाधव, नगरसेविका उषाताई झांबड, गेंदमल बांठिया, झेड.आर. मुथा, विजय कुचेरिया, विजय कांकरिया, महेश दुग्गड, पवन अंभुरे, पवन झांझरी, मुकेश जैन, दर्शन कळमकर, अजित मोगले, राजेश भटेवडा, बंडू संघई, वसंतराव अंभुरे, प्रशांत सावजी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर आनंदनगर येथील नेमीनाथ दिगंबर जैन मंदिर, भजनगल्लीतील चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, सुभाष रोडवरील गोडी पार्श्वनाथ जैन मंदिर या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करण्यात आला.पूर्णा, सेलू, मानवतमध्ये कार्यक्रमपूर्णा, मानवत, सेलू तालुक्यातही बुधवारी भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ पूर्णा येथे जैन मंदिरापासून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली़ त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले़ सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी घेण्यात आले़ रतन सायरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जि़प़ शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले़ मानवत येथेही शहरातून शोभायात्रा काढण्यात आली़ पेठ गल्लीतील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर यांचा पंचामृत अभिषेक व जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम पार पडला़ जयंतीनिमित्त चित्रकला व इतर स्पर्धा घेण्यात आल्या़ सेलू येथे जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम पार पडले़ शहरातून काढलेल्या शोभायात्रेत महिला, युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ यानिमित्त शहरात विविध स्पर्धाही पार पडल्या़

टॅग्स :parabhaniपरभणीReligious programmeधार्मिक कार्यक्रमMahavir Jayantiमहावीर जयंती