शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सनकी आजोबाचे कौर्य; अंगणात खेळणाऱ्या नातवाचा विळ्याने वार करून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 7:21 PM

Grandfather killed his grandson by stabbing in Parabhani District सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान बालकाचा मुत्यू

ठळक मुद्देखुनाचे कारण अस्पष्ट आरोपीस पोलिसांनी केली अटक

सेलू  :- अंगणात खेळत असलेल्या ६ वर्षीय नातवाच्या पोटावर चुलत आजोबाने धारदार विळ्याने वारकरून खून केला. ही धक्कादायक घटना तालुक्यातील चिकलठाणा बु येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पोलीसांनी आरोपी दिगंबर गणपत जाधव (५२) यास अटक केली आहे. 

चिकलठाणा बु येथे आदिराज श्रीराम जाधव हा ६ वर्षीय बालक घराच्या अंगणात खेळत असतांना त्याचा चुलत आजोबा दिगंबर गणपत जाधव (५२) याने आदिराजचा अचानक गळा दाबण्यास सुरूवात केली. हा प्रकार बालकाच्या आईने पाहताच आदिराज यास वाचविण्यासाठी धावली. आजोबाच्या तावडीतून बालकाला सोडविण्याचा प्रयत्न केला. पंरतु,   दिगंबर याने हातातील विळयाने आदिराज याच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले. सदरील बालकास सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा दुदैवी मुत्यू झाला. 

आरोपी अटकेत

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांनी चिकलठाणा येथे जाऊन आरोपी दिगंबर गणपत जाधव यास अटक केली आहे. दरम्यान चुलत आजोबाने नातवाचा खून  कोणत्या कारणावरून केला याचा शोध पोलीस घेत आहे.  याप्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी