लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून गेल्या तीन महिन्यात चार कर्मचाऱ्यांच्या सायकलींची व दोन कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकलींची चोरी झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फारस्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे चोरीच्या घटना घडत आहेत. तीन महिन्यांपूर्वी नगरविकास विभागातील कर्मचारी यमगार यांची सायकल चोरीला गेली. त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान केंद्र विभागातील शिपाई सुदाम पकवाने यांची सायकल चोरीला गेली. त्यानंतर निसार अहेमद जमादार या कर्मचाºयाची सायकल चोरीला गेली.दोन दिवसांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या कार्यालयातील शिपाई दत्तात्रय शहाणे यांची सायकल या परिसरातून चोरीला गेली. याशिवाय पुरवठा विभागातील अव्वल कारकून विजय मोरे व रमेश महादर या दोन कर्मचाºयांच्या मोटारसायकलींचीही चोरी झाली आहे. एकाही प्रकरणात चोरटे सापडलेले नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सीसीटीव्ही कॅमेरे बंद४जिल्हाधिकारी कार्यालय परिसर हा प्रशासकीयदृष्ट्या संवेदनशील भाग आहे. त्यामुळे या परिसरात कायमस्वरुपी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असणे आवश्यक आहे; परंतु, दोन दिवसांपूर्वी येथील सायकल चोरीची घटना घडल्यानंतर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींची माहिती घेतली असता ते अनेक महिन्यांपासून बंद पडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमेºयांची देखभाल करणारे अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या निदर्शनास ही बाब कशी काय आली नसेल, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
परभणी जिल्हा कचेरी परिसरातून सहा वाहनांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:31 AM