यामध्ये सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे, डॉ.संजय रोडगे, हेमंतराव अढळकर यांची जिल्हा विकास समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सेलू तालुका विकास समितीच्या सदस्यपदी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, नगरसेवक मनीष कदम,सामाजिक कार्यकर्ते जयसिंग शेळके यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंग परभणी जिल्हा समन्वयक किशोर घडे , कैलास कदम यांनी दिली आहे.
प्रवाशांची हेळसांड देवगावफाटा: परिवहन महामंडळाच्या बसच्या दुरवस्था झाली आहे.या बसचा प्रवास पूर्ण होण्यापूर्वी कुठे बिघाड होईल हे सांगता येत नाही. याशिवाय तुटलेले सिट, बसमधील धूळ तर विचारता सोय नाही. खिळखिळ्या खिडकीच्या आवाजाने तर प्रवाशांचा मनस्ताप वाढत असून बस प्रवासाने कर्णदोष व धुळीची ॲलर्जी होण्याची शक्यता आहे.