कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तीन महिने जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसह सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली होती. मात्र, जुलै व ऑगस्ट महिन्यांत या अपघात विभागात येणाऱ्या रुग्ण व नातेवाइकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दारू हेही एक कारण
कोरोनाच्या काळात जिल्ह्यामध्ये सर्व व्यवहारांबरोबर दारूची दुकाने, बार बंद होते. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले होते; परंतु सध्या सर्वत्र अनलॉक झाल्याने महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यावरून दारू पिऊन काही वाहनचालक सुसाट वेगाने गाडी चालवताना दिसून येत आहेत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होण्यास दारू हेही कारण असल्याचे पुढे येत आहे.