भाजीपाल्याचे भाव घसरले
परभणी : जिल्ह्यात आठवडी बाजार बंद असल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक रहात आहे. परिणामी शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव घसरले आहेत. दोन आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने भाव घसरल्याने उत्पादकांना नुकसान सहन करावे लागत आहे.
अहवालांना विलंब
परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र त्याचे अहवाल मिळण्यास विलंब लागत आहे. येथील जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत स्वॅब नमुने तपासण्याची गती वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
विद्यापीठ गेट रस्ता बंद
परभणी : येथील अक्षदा मंगल कार्यालयाजवळील विद्यापीठ गेट परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मागील चार महिन्यापासून या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने नागरिकांना वळसा घेऊन विद्यापीठ गाठावे लागत आहे.
वाळूअभावी घरकुले ठप्प
परभणी : जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने घरकुलांची बांधकामे थांबली आहेत. प्रशासनाने वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी लाभार्थ्यांची मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. खुल्या बाजारात वाळूचे दर गगनाला भिडलेले असल्याने लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामे बंद ठेवली आहेत.