पाथरी (परभणी): नऊ एकर शेतात पेरणी केलेले सोयाबीनचे पीक जोमदार वाढले खरे मात्र शेंगाच लागल्या नाहीत. बोगस बियाणामुळे संपूर्ण पीक वाया गेल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी नाथरा येथील शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
पाथरी तालुक्यातील नाथरा येथील शेतकरी डिगंबर गंगाधर वाकणकर आणि ज्योती डिगंबर वाकणकर यांनी नाथरा शिवारात गट न 110 मधील 9 एकर शेतात सोयाबीन पेरणी केली होती पाथरी येथील गजानन कृषी सेवा केंद्रातून अंकुर सिड्स चे 5 बॅग आणि बूस्टर सिडस च्या 4 बॅग असे 9 नऊ बॅग सोयाबीन पेरणी केली होती सोयाबीन ची वाढ झाली आहे मात्र सोयाबीन ला सेंगा लागल्या नसल्याने शेतकऱ्यांच्या लक्षात आले बोगस बियाणे मुळे नुकसान झाले असून या बाबत शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार केली आहे
कृषी अधिकाऱ्यांमार्फत चौकशीनाथरा येथील शेतकऱ्यांने सोयाबीन ला सेंगा लागल्या नसल्याची तक्रार केली असून या बाबत कृषी अधिकारी यांच्या मार्फत तातडीने चौकशी केली जाणार आहे त्या नंतर तालुका तक्रार निवारण कमिटी मार्फत चौकशी होईल त्या नंतर कारवाई होईल.- भाऊसाहेब खरात, गटविकास अधिकारी पाथरी