बसपोर्टचे काम सुरू
परभणी : शहरातील बसस्थानक परिसरात उभारल्या जाणाऱ्या बसपोर्टचे काम ठप्प पडले होते. मात्र आता ६० लाखांपैकी २५ लाखांचा निधी उपलब्ध झाल्याने काम या बसपोर्टचे काम सुरू झाले आहे.
घरकुलांना अडथळे
परभणी : जिल्ह्यात वाळूचे दर अजूनही कमी झाले नाहीत. परिणामी घरकूल लाभार्थ्यांची गोची होत आहे. उपलब्ध केलेल्या अनुदानात वाळू खरेदी करून बांधकाम करणे शक्य नसल्याने जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांनी बांधकाम बंद ठेवले आहे.
प्रभागात स्वच्छता
परभणी : मनपा प्रशासनाने शहरांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली असून, त्या अंतर्गत प्रभागांतील नाल्यांची सफाई केली जात आहे. दररोज सकाळी स्वच्छता कामगार नेमून दिलेल्या प्रभागांत जावून स्वच्छतेची कामे करीत आहेत. त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
वाहनतळांवर अतिक्रमण
परभणी : शहरात वाहनतळासाठी निश्चित केले्ल्या जागांवर अतिक्रमण झाले असून, वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्याच्या कडेनेच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.