परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना संशयितांची चाचणी करण्यासाठी शिवाजी चौक, काळी कमान, जांब नाका आदी ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. दोन सत्रांमध्ये नागरिकांची तपासणी या केंद्रांवर करण्यात येते. शहरातील शिवाजी चौक हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असल्याने येथे कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या अनुषंगाने सकाळी या केंद्रावर मनपा कर्मचारी मनोज तळेकर, सय्यद यनुस, गणेश सवलाखे आदींनी प्रभाग समिती ‘अ’चे सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक यांच्या मार्गशर्दनाखाली संशयितांची तपासणी केली. दुपारी ४ नंतर मात्र हे सर्व कर्मचारी या केंद्रावरून गायब असल्याचे दिसून आले. जवळपास दुपारी ४.२५ पर्यंत हे चाचणी केंद्र ओस पडले होते. त्यामुळे या केंद्रावर चाचणीसाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले. मनपा आयुक्त देविदास पवार यांचे या प्रक्रियेकडे लक्ष नसल्याने कोरोना चाचणीसाठी अनियमितता होत असल्याचे चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.
कोरोना चाचणी केंद्रावरून दुपारी कर्मचारी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:12 AM