लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून सद्यस्थितीला २७ टँकरच्या सहाय्याने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे.परभणी शहराला राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा होतो. परभणीकरांसाठी येलदरी प्रकल्पातून पाणी घेतले जात आहे. यावर्षी येलदरी प्रकल्पात उपयुक्त जलसाठा शिल्लक नसून शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. राहटी बंधाºयाहून शहराला होणारा पाणीपुरवठा अत्यल्प स्वरुपाचा आहे. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये जलवाहिनी पोहचली नसल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील महिनाभरापासून शहरातील पाणीटंचाईत वाढ झाली आहे. टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने टँकरने नियोजन केले आहे. लहान-मोठ्या अशा २७ टँकरच्या सहाय्याने सद्यस्थितीला शहरी भागात पाणीपुरवठा केला जात आहे. नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे नियमित व मूबलक पाणी मिळत नसल्याने शहरवासियांना आता टँकरच्याच पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.मागील १० दिवसांपासून महापालिकेने शहरातील टँकरची संख्या वाढविली आहे. सद्यस्थितीला प्रभाग समिती १ मध्ये ६, प्रभाग समिती ब मध्ये ८ आणि प्रभाग समिती क मध्ये ६ असे १२ हजार लिटरचे २० टँकर शहरात सुरु आहेत. याशिवाय ६ हजार लिटरचे ४ टँकर असून आवश्यतेनुसार या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.याशिवाय महापालिकेच्या मालकीचे ३ टँकर आहेत. त्यामध्ये २ हजार लिटरचा १ आणि पाच हजार लिटरचे २ टँकर असून एकूण २७ टँकरच्या सहाय्याने शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील टंचाईची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने टँकर वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात निश्चित केले ९५० पॉर्इंटमहानगरपालिकेने टँकर सुरु करण्यापूर्वीच पाणी वितरण करण्याचे नियोजन केले आहे. शहरातील विविध भागांमध्ये सुमारे ९५० पॉर्इंट निश्चित केले असून हे टँकर ठरवून दिलेल्या पॉर्इंट नुसार शहरवासियांना पाणीपुरवठा करीत आहेत. ममता कॉलनी आणि खाजा कॉलनीत जलकुंभावरुन या टँकरला पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. दिवसभरात एक टँकर पाच फेºया करीत आहे.नवीन वसाहतींमध्ये पाण्याची समस्या गंभीर४शहरातील नवीन वसाहतींमध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. या भागात महापालिकेची जलवाहिनी पोहचली नसल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. भूजलपातळी खोल गेल्यामुळे विहीर, बोअर आटले असून पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर ओढावली आहे. अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तसेच मनपाने केलेल्या टँकरच्या नियोजना प्रमाणे पाण्याचे वितरण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठराविक भागातच टँकर फेºया करीत असल्याने उर्वरित भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. मनपाने टँकरचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.१४ दिवसांतून एकवेळा पाणी४शहरातील पाणीपुरवठा योजनेचे नियोजनही मागील सहा महिन्यांपासून विस्कळीत झाले आहे. सद्यस्थितीत शहरवासियांना १४ दिवसांतून एकेवळा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी जलवाहिनी असलेल्या भागातही नागरिकांना टंचाई परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीपुरवठा योजना ३० वर्षापूर्वीची जुनी असून जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती असल्याने हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे जलवाहिनी असलेल्या भागातही पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.
परभणी शहरातील स्थिती : २७ टँकरने केला जातोय पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:51 AM