लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये महावितरणने उभ्या केलेल्या विद्युत रोहित्रांच्या डीपी उघड्याच असल्याने वाहनधारकांबरोबरच पादचाºयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे़ ‘लोकमत’ने गुरुवारी परभणी शहरातील विविध भागातील ४० डीपींची पाहणी केली तेव्हा तब्बल २८ डीपी बॉक्सचे दरवाजे उघडे असल्याचे निदर्शनास आले़महावितरणच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये वीज वितरण व्यवस्था निर्माण केली आहे़ या अंतर्गत विजेचा दाब नियमन करण्यासाठी ठिकठिकाणी विद्युत रोहित्रांची उभारणी करण्यात आली़ या विद्युत रोहित्रांमधून जाणाºया वीजपुरवठ्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रोहित्राच्या खांबाजवळच डीपी बॉक्स (डिस्ट्रूब्युशन बॉक्स) बसविण्यात येतो़ या बॉक्समध्ये प्रवाही वीज तारांना फ्यूज (किटकॅट) बसविले जाते़हा बॉक्स पूर्णपणे बंद असणे गरजेचे आहे़ त्यासाठी बॉक्सला दरवाजे व लॉक बसविले जाते़ मात्र शहरात अनेक ठिकाणी हे डीपी बॉक्स उघडे असल्याचे निदर्शनास आले़ गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास धार रोड, वांगी रोड, कारेगाव रोड, सुपरमार्केट, वसमत रोड, रेल्वे स्थानक, बसस्थानक, गंगाखेड रोड, जुना पेडगावरोड, सरकारी दवाखाना, जांब नाका, गांधी पार्क इ. भागांतील डीपींची पाहणी केली तेव्हा बहुतांश डीपी या सताड उघड्या असल्याचे पहावयास मिळाले़ रस्त्याच्या कडेलाच उभारलेल्या या डीपींचे दरवाजे लावलेले नव्हते़त्यामुळे डीपीतील वीज तारा, फ्युज उघडे होते़ सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला येतील, अशा पद्धतीने हे बॉक्स आहेत़ तसेच रस्त्याच्या कडेला एखादा अपघात झाला तर उघड्या डीपीवर वाहन आदळून मोठी घटनाही घडू शकते़ गुरुवारी केलेल्या पाहणीत गौतमनगर भागातील २, आकाशवाणी केंद्र येथील डीपी पूर्णत: उघडी होती़ या डीपीला दरवाजेही नव्हते़ तर वसंतराव नाईक पुतळ्याजवळील तीनही डीपींना दरवाजे बसविले होते़ परंतु, हँडल लॉक नसल्याचे दिसून आले़बी़ रघुनाथ सभागृहाजवळील डीपीचे दरवाजे तारेने बांधलेले असल्याचे पहावयास मिळाले़ रेल्वे स्थानक परिसरातील डीपीला तर दरवाजे नसल्याने सर्रास ही डीपी उघडी होती़विशेष म्हणजे हा रस्ता वर्दळीचा आहे़ अशीच परिस्थिती साखला प्लॉट भागातील डीपीचीही पहावयास मिळाली़ दर्गा रोडवरील तीन डीपींनाही दरवाजे नव्हते़ तसेच शिवाजीनगर, ज्ञानेश्वर पाटी, जायकवाडी वसाहत, युसूफ कॉलनी या भागातील डीपींचे दरवाजे गायब असल्याचे दिसून आले़तर काद्राबाद प्लॉटमधील तीन डीपी आणि रोझ हॉटेल परिसरातील दोन डीपी बॉक्स विना दरवाज्याचें आढळून आले़ दिवसभरामध्ये विविध भागांमधील ४० डीपींची पाहणी ‘लोकमत’ने केली़ त्यात २८ डिपी बॉक्सचे दरवाजे उघडे असल्याचे तर १२ डीपी बॉक्सचे दरवाजे बंद असल्याचे दिसून आले़ मात्र या पाहणीत एकाही डीपी बॉक्सला हँडल लॉक टाकलेले नव्हते हे विशेष होय. त्यामुळे याकडे महावितरणने गांभिर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात अंदाजे ५६० डीपी४परभणी शहरातील प्रमुख रस्ते, वसाहती आणि चौकांमध्ये सुमारे ५६० डीपी बसविल्या आहेत़ या सर्व डीपींजवळच डीपी बॉक्स बसविलेला असतो़ परंतु, यातील बहुतांश डीपी बॉक्स उघडे असल्याचे पहावयास मिळाले़ विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच डीपी बॉक्सला दरवाजे बसविणे आणि हँडल लॉक टाकण्याचे काम महावितरणने हाती घेतले होते़ तसेच बॉक्सला कलर देण्याचे कामही हाती घेण्यात आले़ परंतु, हे काम गांभीर्याने झाले नसल्याचे या पाहणीत दिसून आले़ शहरात अंदाजे ५६० डीपी४परभणी शहरातील प्रमुख रस्ते, वसाहती आणि चौकांमध्ये सुमारे ५६० डीपी बसविल्या आहेत़ या सर्व डीपींजवळच डीपी बॉक्स बसविलेला असतो़ परंतु, यातील बहुतांश डीपी बॉक्स उघडे असल्याचे पहावयास मिळाले़ विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वीच डीपी बॉक्सला दरवाजे बसविणे आणि हँडल लॉक टाकण्याचे काम महावितरणने हाती घेतले होते़ तसेच बॉक्सला कलर देण्याचे कामही हाती घेण्यात आले़ परंतु, हे काम गांभीर्याने झाले नसल्याचे या पाहणीत दिसून आले़अपघाताच्या शक्यता बळावल्यांशहरात प्रमुख चौकांत आणि रस्त्यांवर बसलेल्या या डीपींच्या बॉक्सला दरवाजे आणि लॉक नसल्याने डीपी धोकादायक बनल्या आहेत़ त्यामुळे बॉक्सला दरवाजे बसविणे आणि ते कायमस्वरुपी लावलेले असणे गरजेचे आहे़ गुरुवारी केलेल्या पाहणीत शालेय विद्यार्थीही या डीपीजवळूनच जात असल्याचे दिसून आले़ चुकूनही डीपीला हात लागला तर विजेचा शॉक लागून अपघाताची घटना घडू शकते़ तसेच उघड्या डीपींमुळे त्या त्या भागातील वीज प्रवाह खाजगी व्यक्ती चालू आणि बंद करण्याची शक्यताही निर्माण होते़ या सर्व पार्श्वभूमीवर डीपी बॉक्स कायमस्वरुपी बंद ठेवावा, अशी मागणी होत आहे़
परभणी शहरातील स्थिती : उघड्या डीपींमुळे वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:31 AM