पातळीने टंचाईत भरलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीची निरीक्षणे नोंदविली असून, त्यात २० गावांमधील भूजल पातळी मोठ्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न नागरिकांना सतावण्याची शक्यता आहे.भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने दर वर्षी टप्प्या-टप्प्याने भूजल पातळीची नोंद घेतली जाते. जिल्ह्यातील ८६ निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेतल्या जातात. या विहिरींची पाणी पातळी आणि मागील पाच वर्षांतील सरासरी पाणी पातळी याची तुलना करुन भूजल पातळीतील घट अथवा वाढीचा निष्कर्ष काढला जातो. जानेवारी महिन्यात या विभागाने निरीक्षण विहिरींच्या नोंदी घेतल्या असून, त्यात ८६ पैकी २० गावांतील विहिरींच्या पाणी पातळीत घट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गाव परिसरातील भूजल पातळीतही घट झाल्याने पाण्याचे स्त्रोत आटत असल्याचेच दिसत आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने परभणी तालुक्यातील १४ गावांतील निरीक्षण विहिरींची नोंद घेतली असून, त्यात नांदापूर येथील विहिरीची पाणी पातळी ०.२० मीटरने खोल गेली आहे. त्याचप्रमाणे मुरुंबा या गावात ४.६६ मीटरने पाणी पातळीत घट झाली आहे. असोला येथे ३.५० मीटर आणि नांदगाव बु. येथे ४.८३ मीटरने भूजल पातळी घटली आहे.पूर्णा तालुक्यातील ६ गावांमधील भूजल पातळीची नोंद घेण्यात आली. त्यात कात्नेश्वर येथील भूजल पातळी ५.७४ मीटरने घटली आहे. सेलू तालुक्यातील तीन गावांच्या भूजल पातळीत घट झाली आहे. त्यामध्ये म्हाळसापूर गावची भूजल पातळी ३.३० मीटरने, ढेंगळी पिंगळगाव ०.७४ मीटर आणि शिंदे टाकळी या गावाची पातळी ३.०४ मीटरने घटली आहे. मानवत तालुक्यात नरळद या गावात ०.८२ मीटरची घट आहे. गंगाखेड तालुक्यातील तीन गावांच्या भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली आहे.त्यात खळी ४.४२, महातपुरी ०.०६ आणि डोंगर पिंपळा गवात ०.०८ मीटरची घट आहे. पालम तालुक्यात फरकंडा या गावची पातळी १.३४ मीटरने घटली आहे़ जिंतूर तालुक्यामध्ये १९ निरीक्षण विहिरींची नोंद घेण्यात आली़ त्यात ७ विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली आहे़ बामणी बु़ येथे १़१२, कवडा येथे १़५०, कोलपा ०़९०, धानोरा १़५८, अंबरवाडी ०़१०, असेगाव १़७६ आणि दुधगाव येथे १़४२ मीटरने पाणी पातळी घटली आहे़जानेवारी महिन्यातील हा अहवाल असून, आता उन्हाळ्यातील दोन महिने ओलांडले असल्याने भूजल पातळीत यापेक्षाही अधिक घट झाल्याने ग्रामीण भागात टंचाईचे संकट तीव्र होत आहे़कात्नेश्वर : परिसरात सर्वाधिक घट४मागील पाच वर्षाच्या भूजल पातळीची तुलना करता यावर्षी जानेवारी महिन्यात घेतलेल्या भूजल पातळीच्या नोंदीमध्ये पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर या एकाच गावात भूजल पातळी सर्वाधिक खोल गेली आहे़ ५़७४ मीटरने या ठिकाणी भूजल पातळीत घट आहे़ पाच वर्षांच्या सरासरीनुसार कात्नेश्वर येथील भूजल पातळीत ९़२६ मीटरवर होती तर ती यावर्षीच्या जानेवारी महिन्यात १५ मीटरपर्यंत खोल गेली आहे़ अशीच परिस्थिती परभणी तालुक्यातील नांदगाव या गावाची आहे़ मागील पाच वर्षामध्ये ८़५७ मीटरपर्यंत असलेली भूजल पातळी यावर्षी मात्र १३़४० मीटरपर्यंत खोल गेली आहे़ तर परभणी तालुक्यातीलच मुरुंबा या गावात ५ वर्षांमध्ये सरासरी १२़३४ मीटरवर जाणारी भूजल पातळी यावर्षी मात्र १७ मीटरवर पोहचली आहे़ त्यामुळे ४़६६ मीटरची घट झाली आहे़ भूजल पातळीत होत असलेल्या घटीमुळे पाण्याचा प्रश्न तीव्र होत चालला आहे़
परभणी जिल्ह्यातील स्थिती : वीस गावांच्या भूजल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:15 PM