शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

परभणी जिल्हा रुग्णालयातील स्थिती: एक्स-रे फिल्मचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:02 AM

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीनसाठी लागणाऱ्या फिल्मचा शासनाकडून पुरवठा होत नसल्याने सध्या रुग्णालयात फिल्मचा तुटवडा निर्माण झाला असून फिल्म अभावी एक्स-रे मशीन बंद राहत आहे. परिणामी सामान्य रुग्णालयात येणाºया गोरगरीब रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीनसाठी लागणाऱ्या फिल्मचा शासनाकडून पुरवठा होत नसल्याने सध्या रुग्णालयात फिल्मचा तुटवडा निर्माण झाला असून फिल्म अभावी एक्स-रे मशीन बंद राहत आहे. परिणामी सामान्य रुग्णालयात येणाºया गोरगरीब रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी खाजगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे.परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील काना-कोपºयातून रुग्ण उपचारासाठी येतात. विशेषत: आर्थिकदृष्ट्या मागास असलेले रुग्ण कमीत कमी खर्चात उपचारा व्हावेत, या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होतात; परंतु, मागील काही महिन्यांपासून सामान्य रुग्णालयातील उपचारासाठीही रुग्णांना खर्चाला सामोरे जावे लागत आहे. शासकीय धोरणांमुळे रुग्णांवर आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाला शासनामार्फत सर्व साहित्याचा पुरवठा केला जातो. त्यात औषधी, वेगवेगळ्या तपासणीसाठी लागणारे साहित्य शासनामार्फत मूबलक प्रमाणात उपलब्ध होणे अपेक्षित आहे; परंतु, मागील काही महिन्यांपासून यात विस्कळीतपणा आल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना सहन करावा लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून सतत औषधींचा तुटवडा जाणवत आहे. मूबलक प्रमाणात औषधी उपलब्ध होत नसल्याने डॉक्टरांना ही औषधी चिठ्ठीवर लिहून द्यावी लागते व रुग्णांना बाहेरुन औषधी विकत घ्यावी लागते.औषधांच्या तुटवड्याबरोबरच मागील काही दिवसांपासून एक्स-रे मशीनच्या फिल्मचा तुटवडाही रुग्णालय प्रशासनाला जाणवत आहे. दोन दिवसांपासून प्रशासनाकडे या फिल्म उपलब्ध नसल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा एक्स-रे काढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. अनेक आजारांवर एक्स-रे पाहूनच उपचार केले जातात. यात अपघातातील रुग्ण, छातीचे विकार या सारख्या रुग्णांचे एक्स- रे काढल्यानंतरच त्यांच्यावर उपचार केले जातात. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीन फिल्म अभावी बंद असल्याने रुग्णांना बाहेरुन एक्स-रे काढावा लागत आहे. एक एक्स-रे काढण्यासाठी १५० ते ४०० रुपयापर्यंतचा खर्च येतो. हा भूर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे. सामान्य रुग्णालयात दररोज सरासरी ६० ते ७० एक्स- रे काढले जातात. मात्र दोन दिवसांपासून एक्स-रे मशीनचे कामकाज ठप्प असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.तीन महिन्यांनी होते बैठकजिल्हा सामान्य रुग्णालयातील कामकाजा दरम्यान येणाºया अडचणींवर तोडगा काढण्यासाठी रुग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. दर तीन महिन्याला रुग्ण कल्याण समितीची बैठक घेतली जाते. या बैठकीत कामकाजादरम्यान येणाºया अडचणी, साहित्य खरेदी आदी विषयांच्या प्रस्तावांवर चर्चा करुन खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी घेतली जाते. परभणी जिल्ह्यात विधानपरिषदेची आचारसंहिता लागू असल्याने आतापर्यंत रुग्ण कल्याण समितीची बैठक झाली नाही. २१ मे रोजी विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रुग्ण कल्याण समितीची बैठक घेतली जाणार असल्याचे समजते.फिल्मची मागणी नोंदविलीरुग्णांचे एक्स-रे काढण्यासाठी मोठ्या आकाराच्या फिल्म उपलब्ध आहेत. परंतु, लहान आकाराच्या फिल्मचा तुटवडा निर्माण झाला आहे. उपलब्ध फिल्म अत्यावश्यक बाबींचे रुग्ण तसेच कोर्ट केसेसमधील रुग्णांच्या एक्स-रे साठी राखून ठेवल्या आहेत. कोल्हापूर येथील विशाल इंटरप्रायजेसकडे फिल्मची मागणी नोंदविली आहे. शासकीय कोट्यातून फिल्म उपलब्ध होत नसल्याने खाजगी स्वरुपातून या फिल्म विकत घेतल्या जात आहेत. येत्या एक- दोन दिवसांत फिल्म उपलब्ध होतात, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.स्थानिक स्तरावरच उपाययोजनाजिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्याचा पुरवठा राज्यस्तरावरुन केला जातो. औषधी आणि इतर आवश्यक ते साहित्य गरजेनुसार मागविले जाते. मागणी नोंदवूनही वेळेत पुरवठा होत नसल्याने स्थानिकस्तरावर कामकाज करताना अधिकाºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी जिल्हा नियोजन समिती अथवा इतर योजनांमधून औषधी, साहित्य खरेदी करुन उपाययोजना करावी लागत आहे. राज्य शासनाने मूबलक स्वरुपात औषधी आणि साहित्याचा नियमित पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.सिटीस्कॅनलाही लागेना मुहूर्तसामान्य रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन दोन वर्षापासून बंद असल्याने रुग्णांना सीटीस्कॅनसाठी स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागत आहे. जिल्ह्यासाठी सीटीस्कॅन मशीन मंजूर झाल्याचे वर्षभरापासून सांगितले जात आहे. राज्यस्तरावरुन ही मशीन उपलब्ध होणार आहे. परंतु, अद्यापपर्यत या संदर्भात गतीने कारवाई झाली नसल्याने रुग्णांना दोन वर्षांपासून सीटीस्कॅनच्या चाचणीसाठी खाजगी रुग्णालयाची दारे ठोठवावी लागत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीhospitalहॉस्पिटलmedicineऔषधं