काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, लहू क्रांती संघर्ष सेना यांच्यासह सामाजिक संघटनांनी बोरी बंद, रॅली व रास्ता रोकोला पाठिंबा दिला. यावेळी शेतकरीविरोधी विधेयकांचा निषेध करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नागसेन भेरजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष इरशाद पाशा चांद पाशा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी, जि.प. सदस्य प्रभाकरराव वाघीकर, ॲड. सुरेशराव चौधरी, अंकुशराव राठोड, शशिकांतराव चौधरी, अरुण हरकळ, राजू कसबे, भिवाजी मानवते, कृष्णा राऊत दुधगावकर, शशिकांत चौधरी, शेख नईमोद्दीन, यशवंतराव देशमुख, रमेश कड, दासराव कनकुटे, तसलीम कुरेशी, सचिन बोबडे, सचिन मानवते, सुमित घोडके, किशोर गवारे, शेख इस्माईल भाई, माऊली कदम, बापूराव कदम, योगेश कंठाळे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कौसडी फाट्यावर एक तास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:13 AM