लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढावे, यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या संकल्पनेतून बीडीओंचा अभ्यास दौरा काढण्यात आला.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील ईश्वेध बायोटेकमधील विविध झाडांची पाहणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी सीईओ शिवानंद टाकसाळे, कृषिभूषण कांतराव झरीकर, रमेश माने, ईश्वेधचे संचालक संजय वायाळ, गायकवाड, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, अनुप पाटील, अमित राठोड, व्ही.आर. चकोर आदींची उपस्थिती होती.
१३ केंद्रांवर आज शहरात लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहर महापालिकेच्या १३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आज विविध वयोगटासाठीचे लसीकरण होणार आहे.
यामध्ये ३० ते ४४ आणि ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी कोवॅक्सिनचा दुसरा डोस तसेच कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस उपलब्ध आहे. याशिवाय १८ ते २९ वयोगटातील लाभार्थ्यांचा दुसरा डोस जिल्हा रुग्णालय परभणी येथे उपलब्ध आहे. यामध्ये जायकवाडी, साखला प्लॉट, शंकर नगर, वर्मा नगर, दर्गा रोड, समाजमंदिर हडको, बालविद्यामंदिर व अन्य दोन रुग्णालयात कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर खंडोबा, खानापूर, इनायतनगर येथे कोवॅक्सिन लस उपलब्ध असेल.
बोरी पोलीस ठाण्यात आरोग्य तपासणी
बोरी : आधार बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान नांदेड व सुमेध सेवाभावी संस्था यांच्या वतीने बोरी पोलीस ठाण्यामध्ये २० जून रोजी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. दीपक मोरे, दीपक सोनवणे, विश्रांत मोरे, सुरेश तांबे, संदीप कळंबे, मासूम शेख यांनी आरोग्य तपासणी केली.