गंगाखेड (परभणी ) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान राज्य महामार्गावरील इटारसी नदी पुलाजवळ रास्ता रोको करण्यात आला.
रिलायन्स पिकविमा कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, सोयाबीन उत्पादकांना ४० हजार रूपये विमा देण्यात यावा, बोंडअळीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ३८५०० रूपये मदत देण्यात यावी, गारपीट अनुदानातुन वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, खरीप हंगामासाठी पिककर्ज द्यावे, रानडुक्करांचा बंदोबस्त करावा आदी मागण्यां यावेळी करण्यात आल्या.
आंदोलकांनी शासन विरोधी घोषणा देत महामार्गावरील वाहतूक बंद पडली. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाली. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान शिदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रल्हादराव मुरकुटे, शेकापचे गोपीनाथराव भोसले, माऊली लंगोटे, शेकापचे गोपीनाथ भोसले, वैजनाथ सोळंके, श्रीहरी लंगोटे, गजानन पारे, रामकीशन शिंदे, नागेश शिंदे, आप्पाराव कदम, विष्णु शिंदे, रमेश शिंदे, बन्सीधर शिंदे, पंढरी शिंदे, बाळासाहेब शिंदे, विनायक शिंदे, गणपत शिंदे, दासराव शिंदे, चेअरमन विठ्ठलराव शिंदे आदींसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलना दरम्यान पोलीस निरीक्षक सोहन माछरे, पोउपनि भाऊसाहेब मगरे, जमादार प्रकाश रेवले, उमाकांत जामकर, कल्याण साठे, शेख जिलानी, वसंत निळे, सुरेश पाटील, नवनाथ मुंडे, वल्लभ धोतरे, सुलक्षण शिंदे, वेदप्रकाश भिंगे, तुकाराम शिंदे, मुक्तार पठाण आदींनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.