कार्यालयात अस्वच्छता
परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरामध्ये अस्वच्छता निर्माण झाली आहे. जागोजागी पान, गुटखे खावून थुंकल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे.
बसस्थानकात दुर्गंधी
परभणी : येथील बसस्थानकाच्या समोरील नाला तुंबला असून, त्याची दुर्गंधी परिसरात पसरत आहे. या नाल्याची नियमित स्वच्छता होत नसल्याने हा परिसर दुर्गंधीयुक्त बनला आहे. प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
घरकुलांची कामे रखडली
परभणी : जिल्ह्यात वाळू उपलब्ध होत नसल्याने शासनाच्या घरकूल योजनेची कामे रखडली आहेत. खुल्या बाजारपेठेत वाळूचे भाव गगनाला भिडले असून, महागाईची वाळू खरेदी करणे शक्य नसल्याने लाभार्थींची बांधकामे बंद ठेवली आहेत.
धुळीचा त्रास वाढला
परभणी : परभणी शहराकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ झाली आहे. गंगाखेड, वसमत आणि जिंतूर रस्त्यावर दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. खड्ड्यांमुळे ही धूळ वाढली आहे.