पाथरी (परभणी): महामार्गावर मोबाईलवर बोलत मोपेड चालवणे एका दाम्पत्याच्या जीवावर बेतले आहे. पाथरी- माजलगाव महामार्गवर समोरून अचानक गाडी आल्याने मोबाईलवर बोलणाऱ्या पतीचे नियंत्रण सुटून मोपेड रस्त्याखालीलं खड्ड्यात गेली. रत्याच्याजवळ असलेल्या तारेत गळा अडकल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर झाली. बजरंग कुटे ( ४५ ) असे मृताचे आहे.
मानवत येथील कापड व्यापारी बजरंग कुटे हे पत्नी सुशीला सोबत नित्रुड येथून मानवतकडे आपल्या मोपेडवरून प्रवास करत होते. दुपारी १२ वाजेच्या पाथरी-ढालेगाव दरम्यान आष्टी फाटा मार्गावर त्यांच्या मोपेडचा अपघात झाला. यात बजरंग कुटे यांच्या डोक्याला गळ्याला आणि डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुशीला कुटे या गंभीर जखमी झाल्या आहेत. सुशीला यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.
गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे ठरले जीवघेणेमोपेडवरून मानवतकडे परतत असताना बजरंग कुटे यांना फोन आला. यामुळे कुटे यांनी फोनवर बोलत मोपेड सुरु ठेवली. दरम्यान, अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे कुटे यांचे नियंत्रण सुटून मोपेड रस्त्याखालील खड्ड्यात कोसळली. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेली तार कुटे यांच्या गळ्यात अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेल्या सुशीला या गंभीर जखमी झाल्या आहेत.