मनपा हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे काम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शिक्षकांच्या सेवा अधिग्रहीत केल्या आहेत. महानगरपालिकेच्या हद्दीत शहरी भागात विविध आस्थापनांमध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी उपलब्ध असताना केवळ ग्रामीण भागातील शिक्षकांना या कामासाठी नियुक्त करणे अन्यायकार आहे. जि.प. शिक्षकांच्या सेवा सध्या बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना शोधण्यासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. जि.प. प्राथमिक शिक्षकांना यापूर्वीच गावा-गावांत जावून कोरोना सर्वेक्षणाचे काम करावे लागत आहे. त्यात आता मनपा हद्दीतही शिक्षकांच्या सेवा अधिग्रहीत केल्या आहेत. तेव्हा या शिक्षकांना मनपा हद्दीतील कामांमधून वगळावे, अशी मागणी प्रोटॉन ट्रेड युनियनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर आर.एम. घोडके, संतोष जमादार, सी.आर. तुपसुंदर, के.बी. पाथरकर, एच.सी. लहाने आदींची नावे आहेत.
कोविडच्या कामातून शिक्षकांना वगळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:18 AM