दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा
सेलू : तालुक्यात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून, दुधना नदीपात्रातून दिवस-रात्र अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. ट्रॅक्टरमधून सर्रास या वाळूची वाहतूक केली जात असून, यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. वाळूला सोन्याचा भाव आल्याने वाळू माफिया मालामाल होत आहेत.
मुख्य रस्त्यांच्या पूर्णत्वाची आशा
परभणी : गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या रस्त्यांकडे डोळे लावून बसलेल्या परभणीकरांना यावर्षात तरी जिंतूर, गंगाखेड, मानवत रोड ते झिरो फाटा हे प्रमुख तीन रस्ते पूर्ण होण्याची आशा लागली आहे. राज्यस्तरावर चर्चेत आलेल्या परभणी - गंगाखेड व परभणी - जिंतूर या रस्त्यांच्या कामासाठी १७ एप्रिल २०१८ रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी निधीची घोषणा केली होती. त्यात परभणी - गंगाखेड रस्त्यासाठी २०२ कोटी रुपये तर परभणी - जिंतूर रस्त्यासाठी २१२ कोटी रुपयांचा समावेश होता. सध्या हे रस्ते पूर्णत्वाकडे जात असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आरोग्य यंत्रणेला हवी बळकटी
परभणी : खिळखिळ्या झालेल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, या यंत्रणेला सक्षम करण्यासाठी आतापर्यंत फारसे प्रयत्न झाले नाहीत. कोरोनाच्या संकटाने या यंत्रणेचा पांगुळपणा उघडा पडला. त्यामुळे भविष्यात आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी मनुष्यबळ भरती, भौतिक सुविधा वाढविण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत.
पुरातन वारशाला मिळणार झळाळी
परभणी : अकराव्या शतकातील चालुक्य काळात उभारलेल्या जिल्ह्यातील पुरातन मंदिरांच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू झालेल्या लोकचळवळीला आता प्रशासनाची साथ मिळाली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या पुरातन मंदिरांना यावर्षी नवी झळाळी मिळणार असून, जुन्या मंदिरांच्या संवर्धनाबरोबरच हा पुरातन वारसा नव्याने पुढील पिढीसमोर मांडला जाणार आहे.