शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

टेम्पोच्या धडकेत सायकलस्वार बालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 1:23 PM

बालकाच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

गंगाखेड (परभणी ) : सुटीच्या दिवशी सायकल खेळण्याचा आनंद घेणाऱ्या एका नऊ वर्षीय बालकाचा टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना  दत्त मंदिर परिसरात ईसाद रोडवर घडली. आज सकाळी (दि. ६) सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील मृत बालकाचे नाव श्रुतुराज विष्णू जाधव असे आहे. 

विठ्ठल नगर येथे राहणारा श्रुतुराज विष्णु जाधव हा आपल्या आई व बहिणीसह राहत असे. आज सुटी असल्याने तो सकाळीच घरासमोर सायकल खेळत होता. काही वेळ घरासमोर सायकल खेळत असताना तो दत्त मंदिर परिसरातील इसाद रोडवर आला. याच दरम्यान कापूस घेऊन जाणाऱ्या भरधाव वेगातील एका आयशर टेम्पोने श्रुतुराजला धडक दिली. या जोरदार धडकेत श्रुतुराज खाली पडला आणि त्याच्या डोक्यावरून टेम्पोचे टायर गेले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सपोनि सुरेशराव थोरात, सपोनि राजेश राठोड, जमादार वसंत निळे, बळीराम करवर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिड वर्षात जाधव कुटुंबावर दुसरा आघातश्रुतुराज याच्या वडिलांनी सुमारे दिड वर्षापूर्वी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली होती. तेंव्हापासून श्रुतुराज त्याच्या आई व लहान बहिणीसोबत विठ्ठल नगर येथे राहत होते. गुढी पाडव्याच्या दिवशीच या बालकाचा अपघाती मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दिड वर्षात हा दुसरा आघात झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूparabhaniपरभणी