शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

परभणीत पहिल्यांदाच रंगणार ठाकरे शिवसेनाविरुद्ध रासपचा सामना; कोणाची किती ताकद?

By मारोती जुंबडे | Updated: April 17, 2024 17:45 IST

मतदार संघात महायुती अन् महाविकास आघाडीची ताकद तुल्यबळ असल्याने जोरदार लढत पाहायला मिळत आहे

परभणी : लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हे पाच वेळेस एकमेकांसमोर आले. या लढतीमध्ये आजपर्यंत शिवसेनेने बाजी मारली. परंतु, आता पहिल्यांदाच लोकसभेच्या आखाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेविरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारात लढत होत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे १९९९ मध्ये स्थापना झाल्यानंतर पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत सुरेश वरपूडकर यांनी राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले होते. याशिवाय रावसाहेब जामकर काँग्रेसकडून होते. यावेळी शिवसेनेचे उमेदवार सुरेश जाधव यांनी जामकर यांचा ४३ हजार मतांनी पराभव केला होता. तर वरपुडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाल्यानंतर परभणी मतदार संघ राष्ट्रवादीकडे गेला. त्यानंतर २००४, २००९, २०१४ अशी सलग तीन वेळा या मतदारसंघात राष्ट्रवादी- शिवसेना अशीच लढत झाली. यात प्रत्येक वेळी शिवसेनेने राष्ट्रवादीवर मात केली. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांना ५ लाख ३८ हजार ९४१ तर राष्ट्रवादीच्या विटेकर यांना ४ लाख ९६ हजार ७४२ एवढी मते मिळाली होती. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही विटेकरविरुद्ध जाधव असाच सामना रंगणार असल्याची अपेक्षा परभणीकरांना होती. मात्र ती फोल ठरली. शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीने रासपकडून महादेव जानकर यांना संजय जाधव यांच्याविरुद्ध रणांगणात उतरवले. 

महायुती अन् महाविकास आघाडीची ताकदपरभणी लोकसभा मतदार संघात परभणी, गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी हे ४ विधानसभा मतदारसंघ परभणीत तर परतूर आणि घनसावंगी हे जालना जिल्ह्यात येतात. यातील महाविकास आघाडीचे आमदार असलेला परभणी शिवसेना (ठाकरे गट), पाथरीत सुरेश वरपुडकर काँग्रेस आणि घनसावंगीतून राजेश टोपे (शरद पवार राष्ट्रवादी) अशी ताकत आहेत. तर महायुतीकडे जिंतूर मेघना बोर्डीकर (भाजप), गंगाखेड रत्नाकर गुट्टे (रासप) अन् परतूरमध्ये बबनराव लोणीकर हे भाजप आमदार असे ३-३ विधानसभा मतदार संघ दोन्हीकडे आहेत.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरsanjay jadhav ubtसंजय जाधवparbhani-pcपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४