शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

जगाचा पोशिंदा पाच दिवसांआड घेतोय गळफास; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 2:15 PM

कोसळलेले भाव, दुष्काळ ठरताहेत शेतकरी आत्महत्येची कारणे

परभणी : पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न या काळात दुप्पट झाले की नाही, हा मंथनाचा विषय असला तरी दुसरीकडे मात्र परभणी जिल्ह्यात जगाचा पोशिंदा म्हणून संबोधल्या जाणारा बळीराजा ५ दिवसांआड आपले जीवन संपवत असल्याची विदारक स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे. मात्र, ही स्थिती बदलण्यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक ते बदल होत नसल्याचे दिसून येत आहे.

शासन-प्रशासनाकडून विविध विभागांद्वारे योजनांची जंत्री शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित बियाणे वितरण, कृषी अवजारे, सिंचन साधनांना अर्थसहाय्य आदी योजना राबविण्यात येतात. त्यातच २०१४ मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा नारा दिला. मात्र, हे आश्वासन देऊन ८ वर्षे उलटले. परंतु, शेतकऱ्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे दिसून येते. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत बळीराजा कष्टाने शेतमाल उत्पादित करतो. मात्र, त्या शेतीमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही, अशा परिस्थितीत शेतीमधून शेतकऱ्यांना स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल, एवढी देखील कमाई मागील काही दिवसांपासून होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच यावर्षी सध्या कापसाला ८ हजार रुपये तर सोयाबीनला ५ हजार रुपये मिळणारा हा दर पिकांवर केलेला खर्चापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

तर दुसरीकडे या प्रश्नावर लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत नसल्याने शेतकरी पुरता खचला आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्यातील १८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये दर ५ दिवसाला बळीराजा आपल्या गळ्याला फास घेत आहे. त्यामुळे बळीराजाचे जीवन स्वस्त झाले आहे की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मदतीसाठीही कोतेपणा?जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यामध्ये जानेवारीत ६, फेब्रुवारी ६ व मार्च महिन्यात ६ जणांनी बाजारभाव, नापिकी, दुष्काळ, वेळेत न मिळणारे पीक कर्ज यासह विविध कारणांनी गळफास लावत आपले जीवन संपविले आहे. शेतकरी हा कुटुंबातील कर्ता असल्याने त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला प्रशासनाने तत्काळ मदत देणे गरजेचे होते. परंतु, आतापर्यंत केवळ ६ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील २ शेतकरी अपात्र ठरले असून, चौकशीसाठी १० प्रकरणे प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे या तीन महिन्यांत अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत देण्यात आलेली नाही, हे वास्तव आहे.

गतवर्षी ७७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यापरभणी जिल्ह्यातील जमीन ही सुपीक आणि काळी कसदार असली तरी मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र बदलून टाकले आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, कापूस आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतो. परंतु, ही पिके काढणीला आलीच की अतिवृष्टी, सततचा पाऊस, वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आत्महत्या शिवाय पर्याय उरत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत जिल्ह्यात ७७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. त्यातील ६७ शेतकरी राज्य शासनाच्या १ लाख रुपयांचे मदत देण्यात आले. यातील १० प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यातही १६ प्रकरणे मदतीसाठी प्रलंबित असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

आत्महत्येची कारणे-सिंचनाचा अभाव-सततचे भारनियमन-उत्पादनातील घट-बाजारात कोसळलेले भाव-बदलते हवामान-सिंचनाचा अभाव-सावकारी कर्जाचा डोंगर-परतफेडीसाठी तगादा

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीparabhaniपरभणी