- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (जि.परभणी) : फिर्यादीस तिचे मोबाईलमधील फोटो समाज माध्यमावर व्हायरल करून बदनामी करेल, अशा धमक्या देऊन लॉजवर नेत तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी सेलू ठाण्यात शुक्रवारी रात्री उशीरा दोघांविरुध्द पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ वर्षीय मुलीने सेलू ठाण्यात फिर्याद दिली की, जमीर दादा मिया कुरेशी, मोबीन अन्सारी (रा.सेलू) यांनी फिर्यादीस त्याचे मोबाईलमध्ये असलेले फोटो समाज माध्यमावर व्हायरल करून तुझी बदनामी करेल, अशा धमक्या देऊन तिला गुरुवारी दुपारी शहरातील एका लॉजवर नेऊन पीडितेसोबत तिचे इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला. यापूर्वी सुद्धा अंदाजे तीन ते चार महिन्यापूर्वी आरोपी जमीर दादा मिया कुरेशी त्याने ऑटोमध्ये आरोपी मोबीन अन्सारी यास मदतीला घेऊन पिडीतेस शेतात नेऊन त्याने तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला.
याप्रकरणी सेलू ठाण्यात रात्री उशीरा आरोपी जमीर दादा मिया कुरेशी, मोबीन अन्सारी यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी उपविभागात पोलीस अधिकारी सुनिल ओव्हळ, पो.नी. रावसाहेब गाडेवाड यांनी भेट दिली. दोन्ही आरोपी पोलिसाच्या ताब्यात आहेत. सपोनी सुनिल अंधारे तपास करीत असून दरम्यान रात्री काहीकाळ नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी होती.