काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर
By ज्ञानेश्वर भाले | Published: September 3, 2022 05:59 PM2022-09-03T17:59:52+5:302022-09-03T18:00:15+5:30
राज्यभरातील ६६ पदाधिकाऱ्यांची उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव व कार्यकारी सदस्यपदी निवड
परभणी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात राज्यभरातील ६६ पदाधिकाऱ्यांची उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव व कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी कळवले आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष राजेश ललोटिया आणि प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या स्वाक्षरीने राज्यातील जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात एकूण ६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, यामध्ये ११ उपाध्यक्ष, २५ सरचिटणीस, १८ सचिव व १२ कार्यकारी सदस्यांचा समावेश आहे.
यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या उपाध्यक्षपदी राजेश लाडे (नागपूर), अश्विनी खोब्रागडे (चंद्रपूर), नंदकुमार मोरे (ठाणे), सुजित यादव (पुणे), पवन डोंगरे (औरंगाबाद), प्रशांत पवार (बीड), राजकुमार एंगडे (वसमत), किशोर केदार (ठाणे), ॲड. राहुल सावळे (बीड), वंदना गजरे (पश्चिम मुंबई), विनोद बेंडवाल (बुलढाणा) यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश ललोटिया, प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली. आगामी काही दिवसात राज्यात विविध निवडणुकांचा आखाडा रंगणार असून त्याअनुषंगाने काँग्रेसने संबंधित पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे.