लोककलावंतांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने ५ हजार रुपयांपर्यंत जनजागृतीची कामे देण्याचा निर्णय घेतला आहे. ही कामेही सर्वांपर्यंत पोहोचली नाहीत. त्यामुळे कलावंतांची आर्थिक फरपट होत आहे.
मदत हातात किती उरणार?
लोककलावंतांना प्रबोधनाची कामे देऊन ५ हजार रुपयांची मदत दिली जात आहे. मात्र ही मदत तुटपुंजी आहे.
या कामांमधून केवळ ५ हजार रुपये मिळणार असून, संचामध्ये अनेक कलावंतांचा सहभाग असतो. त्यामुळे यातून किती रुपये उरणार, असा प्रश्न आहे.
राज्य सरकारची मदत कधी मिळणार?
लोककलावंतांना मदत मिळावी, यासाठी त्यांना ५ हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत. कलावंतांकडून जनजागृतीचे १० कार्यक्रम करून घेतले जात आहेत. त्यानंतर ही मदत दिली जाते. त्यामुळे मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न लोककलावंतांनी उपस्थित केला आहे.
कलावंतांची फरपट
लॉकडाऊन काळात कामे बंद असल्याने कलावंतांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांच्यासाठी शासनाने थेट आर्थिक मदत देण्याचे नियोजन करावे.
- सुभाष पांचाळ चौधरी
राज्य शासनाकडून दिली जाणारी मदत तुटपुंजी आहे. अजूनही जाहीर कार्यक्रमांना परवानगी नाही. त्यामुळे गैरसोय होत आहे. राज्य शासनाने थेट आर्थिक मदत द्यावी.
- बालासाहेब कानडे
कलावंतांची यादीच नाही जिल्ह्यातील लोककलावंतांची एकत्रित माहिती उपलब्ध नाही.
शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेमार्फत व इतर शासकीय कार्यालयांकडून कामे दिली जातात.
त्यामुळे पात्र लोककलावंत कामांपासून वंचित राहतात.