पाथरी : मुख्य रस्त्यावरील एका दारूच्या दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी गल्ल्यातील तब्बल 9 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना 6 डिसेंबर रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे ( thieves broke liquor shop and lotted 9 lakh cash ) . दरम्यान, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी चोरी केल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेलू कॉर्नर परिसरात पिवर वाईन शॉप नावाचे दारूचे दुकान आहे. सोमवारी ड्राय डे असल्याने नियमित प्रमाणे दुकानाच्या व्यवस्थापकाने रविवारी रात्री वेळेत दुकान बंद केले होते. 'ड्राय डे'मुळे दुसऱ्या दिवशी दुकानाकडे दुपारी 3 वाजे पर्यन्त कोणीही फिरकले नाही. परंतु, दुकानातील लाईट बंद असल्याची माहिती वॉचमनने व्यवस्थापक ज्ञानेश्वर पोळ यांना दिली. त्यांनी दुकान उघडले असता गल्ल्यातील रक्कम चोरीचा गेल्याचे निदर्शनास आले.
दुकानातील सीसीटीव्हीत चोरटे कैद बाजूच्या दुकानावरून चोरटे दारू दुकानाच्या छतावर आले. त्यानंतर मुख्य शटर तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानात प्रवेश करण्यापूर्वी बाहेरील सीसीटीव्हीचे वायर तोडले. प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटातील दीड लाख आणि गल्ल्यातील साडे सात लाख रुपये रोकड लंपास केली. तोंडाला रुमाल बांधलेल्या,काळे कपडे घातलेल्या दोन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या प्रकरणी 6 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके हे करत आहेत.