लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील बसस्थानकावर एका वृद्धाला लुटण्याचा प्रकार होत असल्याचे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निदर्शनास आल्यानंतर पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला.परभणी बसस्थानकावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास स्थानकावरील स्वच्छतागृहाच्या जवळ एका वृद्ध व्यक्तीला दोघेजण जबरीने झटापट करीत असल्याचे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये पोलीस कर्मचाºयांना निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच पोलीस चौकीतील कर्मचारी बालाजी लटपटे यांनी एका नागरिकास मदतीला घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली आणि दोन्ही चोरट्यांना जागीच पकडले. त्यांची झडती घेतली तेव्हा चोरट्यांजवळ १२०० रुपये रोख व एक ग्रॅमचे सोन्याचे पेंडल मिळून आले.ज्ञानोबा अप्पाराव जवंजाळ (७०) हे दुपारी स्वच्छतागृहात जात असताना त्यांना लुटण्याचा हा प्रकार झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे शुभम अशोक मस्के (१८, रा.भीमनगर) व किरण गुलाबराव लजडे (२२ रा.भीमनगर) अशी नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी दोन्ही आरोपींवर रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.
परभणीत सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले चोरटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:36 AM