आरोपी सय्यद करीम उर्फ सय्यद सयदु हुसेन (रा.औंढा, जि.हिंगोली) याने परभणी शहरामध्ये विविध गुन्हे केले असून, तो मागील दहा वर्षांपासून फरार होता. हा आरोपी परभणी शहरात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, कर्मचारी भुजबळ, केंद्रे, चिंचाणे, गायकवाड, फारुकी, वाघमारे, दीपक मुदीराज यांनी दर्गा रोड भागात २ जानेवारी रोजी रात्री सापळा लावला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास जेरबंद केले. पकडलेल्या आरोपीने त्याचे नाव सय्यद करीम ऊर्फ सय्यद सयदु हुसेन असे सांगितले असून, जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांची त्याने कबुली दिली आहे. आरोपीविरुद्ध कोतवाली पोलीस ठाणे, पूर्णा पोलीस ठाण्यासह हिंगोली शहर आणि औरंगाबाद जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद आहेत. या कारवाईत पोलिसांनी एम.एच. ३८ एन ४७७१ या क्रमांकाची हिंगोली शहरात चोरलेली मोटरसायकलही जप्त केली आहे. आरोपीस कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तीन जिल्ह्यात चोऱ्या करणारा चोरटा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:14 AM